धनगर समाजाला आरक्षण मिळणारच

By Admin | Updated: June 19, 2016 02:00 IST2016-06-19T02:00:52+5:302016-06-19T02:00:52+5:30

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासन अनुकूल आहे. धनगर व धनगढ समाज एकच असून या समाजाला आरक्षण मिळणारच,

Dhangar community will get reservation | धनगर समाजाला आरक्षण मिळणारच

धनगर समाजाला आरक्षण मिळणारच

विकास महात्मे : धनगर व धनगढ समाजाचा मुद्दा पहिले निकाली काढणार
वर्धा : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासन अनुकूल आहे. धनगर व धनगढ समाज एकच असून या समाजाला आरक्षण मिळणारच, अशी माहिती राज्य सभेचे सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईत नुकतीच सर्वच राजकीय पक्षांची याबाबत बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील मंडळी उपस्थित होती. आरक्षण मिळावे, अशी सर्वच राजकीय पक्षांची मागणी होती. धनगर आणि धनगढ हे दोन समाज आहे, असा वाद आहे. वास्तविक, धनगढ आणि धनगर समाज एकच आहे. यासाठी राज्य शासन सर्व्हे करीत आहे. यात दीडेक वर्षांचा कालावधी लागेल, असेही खा.डॉ. महात्मे म्हणाले.
वास्तविक, धनगढ समाजाची संख्या शासन लक्षात घेईल, यानंतर या समाजाला आरक्षण देण्याबाबत अनुकूल असल्याचे पत्र केंद्र सरकारला पाठविले जाईल, असेही खा. डॉ. महात्मे म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत असताना आपली राज्य सभेवर निवड करण्यात आली, याबाबत ते म्हणाले, ही बाब मुख्यमंत्र्यांशीही चर्चिली असता धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सरकारात नसतानाही लावून धरली होती. या समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती खा. डॉ. महात्मे यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेनुसार जगातील २७ टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त आहे. जनतेचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजना अंमलात आणण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याचेही खा.डॉ. महात्मे म्हणाले. याप्रसंगी धनगर समाजाचे अरुण माहुर्ले व अरुण झिले यांच्यासह प्रशांत इंगळे तिगावकर, गुंडू कावळे, प्रशांत काकडे, मनोज तरारे, सचिन गहलोत, मंगला वाडीभस्मे, जितेंद्र गोरडे आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Dhangar community will get reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.