Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची हेल्मेटविना बुलेट सवारी; पोलीस पावती फाडणार का?
By अभिनय खोपडे | Updated: August 12, 2022 15:19 IST2022-08-12T14:35:58+5:302022-08-12T15:19:24+5:30
सेवाग्राम येथील चरखा भवनात जिल्हा प्रशासनाकडून आयोजित स्वातंत्रच्या अमृत महोत्सवच्या कार्यकर्मात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होतें.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची हेल्मेटविना बुलेट सवारी; पोलीस पावती फाडणार का?
वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वर्धेत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवत स्वतः बुलेट चालविली. यावेळी उपमुख्यमंत्री स्वतः दुचाकीने सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला झाला होता.
सेवाग्राम येथील चरखा भवनात जिल्हा प्रशासनाकडून आयोजित स्वातंत्रच्या अमृत महोत्सवच्या कार्यकर्मात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होतें. या कार्यक्रमानंतर भाजपाच्या वतीने हुतात्मा स्मारक ते वर्धेच्या आर्वी नाका पर्यंत तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
या रॅलीला फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवत सुरवात केली. मात्र हिरवी झेंडी दाखवल्यावर स्वतः फडणवीस यांनी बुलेटवर स्वार होत काही अंतरापर्यंत सहभाग नोंदवीला.