विकास कामांमध्ये हयगय खपवून घेणार नाही

By Admin | Updated: June 19, 2016 01:55 IST2016-06-19T01:55:04+5:302016-06-19T01:55:04+5:30

लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Development will not tolerate development work | विकास कामांमध्ये हयगय खपवून घेणार नाही

विकास कामांमध्ये हयगय खपवून घेणार नाही

रामदास तडस : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
वर्धा : लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विकास कामांत हयगय सहन करणार नसल्याचे खडेबोल खासदार रामदास तडस यांनी सुनावले.
सर्व विकासकामे विहित वेळेत पूर्ण करून दर १५ दिवसांनी कामाचा प्रगती अहवाल सादर करावा, तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रातील विकास कामामध्ये यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे कामे खोळबंल्यास संबंधित अधिकाऱ्यावर स्वत: कारवाई करणार असल्याचे खा. तडस यावेळी म्हणाले.
सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने खासदार विकास निधी, राज्य सरकारकडून मंजूर असलेली अर्थसंकल्पीय कामे, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत असलेली कामे, सांसद आदर्श ग्राम तरोडा, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणारी कामे आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला. शासकीय यंत्रणांनीही योग्य वेळेत व विहित मुदतीमध्ये विकासनिधी खर्च करावा व आलेले प्रस्ताव त्वरित मार्गी लावाव्या, अशा सूचना खा. तडस यांनी केल्या.
यावेळी प्रामुख्याने प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी गजभिये, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, आर्वी सा. बां. वि. भाष्करवार, शाखा अभियंता येळणे, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी शाखा अभियंता निखार, नियोजन विभागाचे धोटे, चकाटे, शाखा अभियंता न.प.चे फरसोले तसेच तांदळे, जोशी उपस्थित होते.
‘सांसद आदर्श ग्राम योजना’ अंतर्गत कारंजा तालुक्यातील नव्याने दत्तक घेतलेले गाव ‘पार्डी’ या गावाचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला. पार्डी गावाचा नियोजनबद्ध विकास करावा व जनजागृतीच्या माध्यमातून आदर्श गावाची चळवळ उभी राहावी याकरिता खा. तडस यांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार्डी गावामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व लोकामध्ये नुकतीच जनजागृती होईल व आदर्श गाव संकल्पनेचा शुभारंभ या माध्यमातून होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य शासनाच्या सर्व लोकोउपयोगी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याकरिता अधिकाऱ्यांनी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे व गरजू लोकांपर्यंत अधिकारी व कर्मचारी यांनी केंद्र व राज्यशासनाला योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता सहकार्य करावे, अश्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Development will not tolerate development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.