अद्ययावत तंत्रज्ञान व कार्यकुशलतेने विद्यार्थी बनले कल्पक
By Admin | Updated: October 3, 2016 00:50 IST2016-10-03T00:50:35+5:302016-10-03T00:50:35+5:30
अद्यावत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होतोय. नव तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांत कार्यकुशलता निर्माण होत असून कल्पकतेचे बिज

अद्ययावत तंत्रज्ञान व कार्यकुशलतेने विद्यार्थी बनले कल्पक
भूवन धीर : राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, बदलत्या तंत्रज्ञानाचा घेतला आढावा
वर्धा : अद्यावत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होतोय. नव तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांत कार्यकुशलता निर्माण होत असून कल्पकतेचे बिज नव्या तंत्रज्ञानामुळे रोवल्या जात असल्याचे प्रतिपादन भुवन धीर यांनी केले.
बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या वतीने अॅप्लीकेशन आॅफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग यावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, डॉ. एम.डी. चौधरी, प्रा. यु.डी. गुल्हाणे, प्रा. आर.जे. डहाके, ए.एम.ई.चे समन्वयक डॉ. एम.जे. शेख, प्रा.आर.बी. साळवे, प्रा. निखिल बडोले उपस्थित होते.
पुढे बोलताना धीर म्हणाले, मेकॅनिकल इंजिनिअरीण्ग क्षेत्रात मोठे परीवर्तन होत आहे. हे नवे बदल स्वीकारून अद्यावत तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. या क्षेत्रात नाविण्यतेला भरपूर वाव आहे. कल्पकतेची दृष्टी ठेऊन नवतंत्रज्ञान विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा असे ते म्हणाले.
एम.डी. चौधरी, विभागप्रमुख प्रा. गुल्हाणे यांनी नव तंत्रज्ञानावर प्रकाश टाकताना नव तंत्रज्ञान मेकॅनिकल इंजि. साठी वरदान असल्याचे सांगितले. डॉ. शेख यांनी चर्चासत्राची रूपरेषा विशद केली.
चर्चासत्रात देशभरातून ३०४ विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केलेत. समारोपीय सत्रात उत्तम व्हॅल्यू स्टिल चे उपव्यवस्थापक विवके श्रोती, प्राचार्य डॉ. गायकवाड, डॉ. चौधरी, प्रा. गुल्हाणे, डॉ. शेख, प्रा. राजेश साळवे, प्रा. फुलमाळी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रोती यांनी विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानावर भर देण्याविषयी मार्गदर्शन केले. स्किल बेस नॉलेज ही काळाची गरज आहे. त्यामुळे चांगला अभियंता म्हणून समोर येताना गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मान्यवरांनी राष्ट्रीय चर्चासत्र निश्चितच विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता मार्गदर्शक ठरेल असा सांगितले.
चर्चासत्राला विविध शाखेचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)