मिठाईमध्ये केला जातोय रसायनयुक्त रंगांचा वापर
By Admin | Updated: November 10, 2015 02:54 IST2015-11-10T02:54:01+5:302015-11-10T02:54:01+5:30
गत काही वर्षांपासून परप्रांतातून आलेल्या व्यावसायिक मंडळींनी स्वीट मार्टच्या माध्यमातून प्रत्येक शहरात जम बसविला आहे.

मिठाईमध्ये केला जातोय रसायनयुक्त रंगांचा वापर
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पिंपळखुटा : गत काही वर्षांपासून परप्रांतातून आलेल्या व्यावसायिक मंडळींनी स्वीट मार्टच्या माध्यमातून प्रत्येक शहरात जम बसविला आहे. यातील मिठाईसाठी रसायनयुक्त रंगांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सणांच्या दिवसांत मिठाईला प्रचंड मागणी असते; पण विविध रंगाचे मिश्रण असलेली मिठाई आरोग्याला घातक आहे. चांदीचा अर्क दिसणाऱ्या मिठाईवर प्रत्यक्ष अल्युमिनियमचा लेप असतो. या प्रकरणी अन्य व औषध प्रशासन विभाग कुठलीही कारवाई करीत नाही. बाजारपेठेत विविध रंगाच्या मिठाई उपलब्ध आहेत. मिठाई शोकेसमध्ये उठावदार दिसाव्या म्हणून विक्रेते विविध रासायनिक रंगांचा वापर करतात. बाजारात रंगांचे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. एक नैसर्गिक व दुसरा रासायनिक. अन्न व औषध प्रशासनाच्या मानकानुसार केवळ नैसर्गिक रंग वापरण्याची अनुमती आहे. नैसर्गिक रंगांत बिटाकॅरोसिन, रायबोप्लोर्इंग या रंगांचा वापर प्रामुख्याने मिठाईमध्ये व्हायला पाहिजे; पण मिठाई चमकदार दिसावी म्हणून रासायनिक रंगांचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील गोधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासकीय व विविध कंपन्यांचे दूध कमी पडत असताना स्वीटमार्टमध्ये शेकडो लिटर दुधाची मिठाई तयार होते. यासाठी दूध कोठून येते, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नागरिकांनी यापासून सावध राहणे गरजेचे आहे. अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई करावी, मागणी होत आहे.(वार्ताहर)