लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सावंगी (मेघे) येथील राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या हिमानी मलोंडेचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना साऱ्यांनाच चटका लावून गेली. शहरासह परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृतक हिमानीवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.हिपेटायटीस बी इंजेक्शनची रिअॅक्शन झाल्याने स्थानिक चिंतामणी ले-आऊट येथील हिमानी रवींद्र मालोंडे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. हिमानी ही सावंगी येथील बीएससी नर्सिंग कॉलेजची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. कॉलेजमध्ये विद्यार्थी रूग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांचे आरोग्यावर विपरित परिणाम होवू नये यासाठी तिला शनिवारी हिपेटायटीसचे इंजेक्शन देण्यात आले होते. हे इंजेक्शन आऊट डेटेड असल्याने तिला या इंजेक्शनची गंभीर स्वरूपाची रिअॅक्शन झाल्याची शंका कुटुंबांनी व्यक्त केली. हिमानी हिचे पार्थिव देवळीत आणल्यानंतर बघ्यांनी तिच्या घरासमोर एकच गर्दी केली होती. देवळी तालुक्यातील मुरदगाव खोसे येथील जि. प. शिक्षक रवींद्र मलोंडे यांची हिमानी ही मुलगी होय. वयाच्या चवथ्या वर्षी तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिचा सांभाळ आजोबा दशरथ मलोंडे व वडिलांनी केला. मुलीला उच्च विभूषित करण्यासोबतच स्वत:चे पायावर उभे करण्यासाठी तिला बीएससी नर्सिंगमध्ये दाखल देण्यात आले. कुटुंबियांची हिमानी ही अतिशय लाडकी असल्याने तिने दिवाळीचे सणासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण पाठविले होते.ही बाब अंत्यविधीसाठी आलेल्या नातेसंबंधितांनी लोकमतशी बोलून एकच हंबरडा फोडला. त्यांना यावेळी अश्रूही अनावर होत होते. वडिल व आजोबांची गळाभेट मनाचा ठाव घेणारीच होती. अतिशय शोकाकूल वातावरणात हिमानी हिचे पार्थीव स्मशानभूमीकडे रवाना झाले. यावेळी तिच्या पार्थिवाला अनेकांनी खांदा दिला. स्थानिक यशोदा नदीच्या तिरावर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी देवळी व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्यांने उपस्थिती होती.
शोकाकूल वातावरणात हिमानीला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:23 IST
सावंगी (मेघे) येथील राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या हिमानी मलोंडेचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना साऱ्यांनाच चटका लावून गेली. शहरासह परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृतक हिमानीवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोकाकूल वातावरणात हिमानीला निरोप
ठळक मुद्देइंजेक्शन रिअॅक्शन प्रकरण : दिवाळीला येण्याचे दिले होते निमंत्रण