बहुरूपी कुटुंबीय कोरोनामुळे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:11+5:30

बहुरूपी समाज या भिक्षेतून काही मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवायचे. या समाजातील महिला वर्ग घरोघरी जाऊन गोधडया शिवण्याचे काम करीत असतात. भिक्षेत जगणाऱ्या या कुटुंबातील नव युवकांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत जमेल तो व्यवसाय करण्याचा मार्ग सुकर केला. बहुरूपी समाजातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर गेल्या चार ते पाच वर्षांपासुन हंगामी व्यवसायाची सुरुवात केली आहे .

Desperate because of the multi-family corona | बहुरूपी कुटुंबीय कोरोनामुळे हतबल

बहुरूपी कुटुंबीय कोरोनामुळे हतबल

Next
ठळक मुद्देविकण्यासाठी आणलेला माल घरीच पडून : उदरनिर्वाहाचे साधन हिरावले

लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : बहुरुपीचे सोंग घेऊन दारोदारी भटकणारा समाज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
बहुरूपी समाज या भिक्षेतून काही मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवायचे. या समाजातील महिला वर्ग घरोघरी जाऊन गोधडया शिवण्याचे काम करीत असतात. भिक्षेत जगणाऱ्या या कुटुंबातील नव युवकांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत जमेल तो व्यवसाय करण्याचा मार्ग सुकर केला. बहुरूपी समाजातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर गेल्या चार ते पाच वर्षांपासुन हंगामी व्यवसायाची सुरुवात केली आहे . गिरड परिसरात जवळपास या समाजाची १५० कुटुंब वास्तव्य करीत आहे . गिरड येथे १० कुटुंब राहतात . सर्व कुटुंबातील तरुण वर्ग हंगामानुसार व्यवसाय करतो. यामध्ये प्लास्टिक खुर्ची, लोखंडी रॅक, स्टडी टेबल, ड्रम, बाज, मच्छरदानी या वस्तु ग्राहकांच्या गरजेनुसार बोलवितात. प्रत्येकी कुटुंब महिन्याला ५०००० हजाराचा माल विकतोय . पहाटे ५ वाजता उठुन हे लोक आपल्या दुचाकीवर साहित्य घेऊन दररोज ५० किलोमीटरचा प्रवास करतात. या मिळकतीतून संसाराचा गाडा चालवितात. बहुरूपी बेड्याला लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता सर्व घरी लाखो रुपयांचे साहित्य पडुन आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन व्यवसायात असणारे तरूण चिंतातुर अवस्थेत दिसत आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे मोठया प्रमाणात साहित्याची मागणी वाढत असते. त्यानुसार माल बोलविला जातो. सध्या ठोक माल जेथून आणला त्या व्यापाऱ्यांचे देणेही बाकी राहिले आहे. शिवाय घर चालविण्याची चिंता सध्या त्यांना सतावित आहे. जर पावसाळा पर्यंत लॉकडाऊन सुरू राहिल तर हा सगळा माल उघड्यावर पडुन आहे तो माल खराब होईल ही पण चिंता यांना सतावत आहे . जनधन योजनेअंतर्गत काही कुटुंबाना पैसे आले काही तर काहींना आलेले नाही. प्रत्येकी ५०० रुपये आल्याने एवढया तुटपुंज्या पैशात कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा हा प्रश्न या लोकांन समोर निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन या पारधी समाजाच्या समस्या ऐकून घ्याव्यात अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.

व्यवसाय ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ
उन्हाळ्यात विक्री करण्यासाठी लाखोंचा माल आणला आहे . जवळचे पैसे यामध्ये गुंतले आहे . लॉकडाऊनमुळे एकाकी व्यवसाय ठप्प झाल्याने रोजचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे शासनाने यावर तोडगा काढावा व आमच्या उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लावावा एवढीच आमची मागणी आहे, असे राम किसनाजी शिंदे या बहुरूपी समाजातील तरूण व्यवसायिकाने लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Desperate because of the multi-family corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.