बाप्पाला निरोप
By Admin | Updated: September 9, 2014 00:33 IST2014-09-09T00:33:53+5:302014-09-09T00:33:53+5:30
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. एक लाडू फुटला... गणपत्ती बाप्पा उठला... असे म्हणत दहा दिवस घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे अखेर शनिवारपासून विसर्जन करणे सुरू झाले.

बाप्पाला निरोप
प्रशासनाकडून चोख बंदोबस्त : शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न
वर्धा : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. एक लाडू फुटला... गणपत्ती बाप्पा उठला... असे म्हणत दहा दिवस घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे अखेर शनिवारपासून विसर्जन करणे सुरू झाले. ढोल ताश्याच्या निनादात स्वागत झालेल्या गणेशाला त्याच पद्धतीने निरोपही देण्यात आला. घरी गणरायाची स्थापना करणाऱ्यांनी कुठे विहिरीत तर कुठे तलावात गणरायाचे विसर्जन केले. सकाळपासून असलेल्या पावसामुळे ताशाच्या ठेक्यावर मनमुराद नाचण्याचा अनेकांनी आनंद घेतल्याचे चित्र होते.
पवनार येथील धाम नदीवर गणेशमूूर्तीच्या विसर्जनाची गर्दी द्वादशी पासून सुरू झाली. त्रयोदशीला अनेक घरगुती मूर्तीचे विसर्जन झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जल प्रदुषण होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्नशिल आहे. परंतु काही प्रमाणात का होईना निर्माल्य नदीमध्ये पडलेच. घरगुती गणपती गणेश कुंडामध्ये विसर्जित करण्याकरिता जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीच्यावतीने गणेश कुंडाची व्यवस्था केली. शहरात पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी पालिकेच्यावतीने ड्रम ठेवून नागरिकांना विसर्जनातून होत असलेल्या प्रदुषणाची माहिती देण्यात आली. याला वर्धेकरांकडून बऱ्या प्रमाणात साथही मिळाली. (प्रतिनिधी)
पट्टीच्या पोहणाऱ्यांची चमू
सेवाग्राम पोलिसांच्यावतीने विसर्जनाच्यावेळी कुठलीही गडबड होवू नये म्हणून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. गणेश विसर्जनासाठी राहुल बावणे, शुभम बावणे, राहुल बोरघरे, धिरज बावणे, खुशाल बोरकर, मोरेश्वर हजारे, विवेक राऊत, सुरज मोहिजे, किशोर हजारे, जिवन ठाकरे, शंकर बावणे, इंद्रजित मोहिजे या पट्टीच्या पोहणाऱ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्त केली आहे. त्यांना तसे टी शर्ट पुरविण्यात आले आहे.
मचानीवरून लक्ष
कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून मचानीवरून दुर्बीणीद्वारे टेहळणी केली जात असून वाहतुक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून ट्राफिक पोलीस आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत आहे. सेवाग्राम पो.स्टे.चे ठाणेदार पराग पोटे आपल्या सहकाऱ्यासह व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेऊन आहे.