विस्तार अधिकाऱ्याद्वारे अपंग कर्मचाऱ्याचा अवमान
By Admin | Updated: June 15, 2015 02:06 IST2015-06-15T02:06:51+5:302015-06-15T02:06:51+5:30
स्थानिक पंचायत समितीमधील एस.एन. वांदिले हे कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत आहेत.

विस्तार अधिकाऱ्याद्वारे अपंग कर्मचाऱ्याचा अवमान
सेलू : स्थानिक पंचायत समितीमधील एस.एन. वांदिले हे कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत आहेत. ते ७० टक्के अपंग आहेत. मंगळवारी ते विस्तार अधिकारी पंचायत आर.डी. कांबळे यांच्या अधिनस्थ काम करण्याकरिता रूजू झाले असता बुधवारी ‘मला लंगडे, लुले कशाला दिले’, अशा शब्दात बोलून कांबळे यांनी अपंग कर्मचाऱ्यांचा अवमान केला. या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी होत आहे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या समक्ष कांबळे यांनी त्यांच्याच कक्षात अपंग कर्मचाऱ्याचा अवमान केला. यावेळी अन्य कर्मचारीही उपस्थित होते. सदर प्रकार बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गटविकास अधिकारी यांच्या कक्षात घडल्याची लेखी तक्रार अपंग कर्मचारी वांदिले यांनी केली. विस्तार अधिकारी कांबळे यांना अपंगांना अर्वाच्य शब्दात बोलण्याचा अधिकार कुणी दिला, याची त्वरित चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी वांदिले यांनी गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांना निवेदनातून केली आहे. विस्तार अधिकारी पंचायत यांच्या अधिनस्थ कार्यालयीन काम करणे अत्यंत कठीण झाले आहे. रूजू झाल्यापासून वांदिले यांना त्रास दिला जात आहे. यामुळे चौकशी करून कारवाई करावी व विभाग बदलून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)