समायोजनाला खासगी विद्यालयांची नकारघंटा
By Admin | Updated: January 3, 2015 23:07 IST2015-01-03T23:07:09+5:302015-01-03T23:07:09+5:30
दिवसेंदिवस रोडावत असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्यात अनेक शाळेतील तुकड्या बंद पडल्या. त्याचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना बसला असून एकूण ८३ शिक्षक अतिरिक्त ठरलेत.

समायोजनाला खासगी विद्यालयांची नकारघंटा
अमोल सोटे - आष्टी (शहीद)
दिवसेंदिवस रोडावत असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्यात अनेक शाळेतील तुकड्या बंद पडल्या. त्याचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना बसला असून एकूण ८३ शिक्षक अतिरिक्त ठरलेत. या शिक्षकांचे पुनर्वसन म्हणून इतर शाळांत त्यांचे समायोजन करण्यात येत आहे. मात्र खासगी अनुदानित शाळा त्यांचे समायोजनास नकार देत असल्याची माहिती आहे.
इयत्ता पाचवीपासून दहावी पर्यंतच्या काही तुकड्या विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. पर्यायाने शासनाने विद्यार्थी तपासणी मोहिम राबविली. यात कागदोपत्री पटससंख्या दाखवून अनुदान लाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. यात बरेच शिक्षक अतिरिक्त ठरले. अतिरक्ति शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या शिक्षकांचे समायोजन करण्याकरिता जागा रिक्त असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाच्यावीने पत्रही देण्यात आले. याची माहिती मुख्याध्यापकांनी संस्थाध्यक्ष व संचालकांना दिली. अध्यक्षांनी शिक्षक भरतीतील मलाईपोटी समायोजनाला नकार दिल्याची माहिती आहे.