शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

डेंग्यूने वाढविली नाचणगाववासीयांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 5:00 AM

नाचणगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे  आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. जेणेकरून हा फैलाव इतर भागात होणार नाही . पूलगाव ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंग्यू आजाराची तीव्रता कमी केली हीच प्रतिबंधात्मक उपाययोजना नाचणगाव प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राने राबविली, तर डेंग्यू आजाराचा फैलाव कमी होण्यास मदत मिळेल. कोरोना विषाणूचे सावट असताना त्यात डेंग्यूची वाढ झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाकडून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नजीकच्या नाचणगावात डेंग्यू  आजाराने डोके वर काढले असून, दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातील बऱ्याच रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले. तसेच रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये भरती असल्यामुळे रुग्णांचा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची संपर्क आला नाही. नाचणगाव  प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गुंजखेडा या गावात डेंग्यूचे रुग्ण नुकतेच आढळले होते. त्यानंतर नाचणगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे  आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. जेणेकरून हा फैलाव इतर भागात होणार नाही . पूलगाव ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंग्यू आजाराची तीव्रता कमी केली हीच प्रतिबंधात्मक उपाययोजना नाचणगाव प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राने राबविली, तर डेंग्यू आजाराचा फैलाव कमी होण्यास मदत मिळेल. कोरोना विषाणूचे सावट असताना त्यात डेंग्यूची वाढ झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. रिकामे भूखंड ठरत आहेत डोकेदुखी नाचणगाव ग्रामपंचायतचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे येथे  लेआउटची संख्या जास्त प्रमाणात आहे. परिणामी भूखंडधारकांची संख्या वाढली आहे अशा परिस्थितीत खाली भूखंडात पावसाचे पाणी तसेच झाडेझुडपे व काही ठिकाणी तर सांडपाणी साचलेले दिसून येते. त्यामुळे रोगराई प्रसार होण्यास आमंत्रण मिळत आहे. हे भूखंड कित्येक वर्षांत साफ झाले नसल्यामुळे तिथे जंगल निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीला ते धोकादायक ठरत आहे. 

डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी सरसावला आरोग्य विभाग 

देवळी :  दिवसेंदिवस डेंग्यू आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता, याचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे. कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून गावागावात कंटेनर व जलद ताप सर्वेक्षण करून रुग्णांचा आढावा घेतला जात आहे. तालुक्यातील गौळ, हुसनापूर, भिडी, कोल्हापूर राव, रत्नापूर, वाबगाव आदी गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी राबत आहेत.  साचलेल्या पाण्यात डेंग्यूचा डास कसा राहतो, याविषयीची प्रात्यक्षि दाखवून जनजागृती केली जात आहे. डेंग्यूचे डास साठवून ठेवलेल्या पाण्यात वाढतात. यामध्ये कूलरच्या पाण्याची टाकी, पक्ष्याचे पाणी पिण्याचे भांडे, फ्रीजचा ट्रे, फुलदाणी, तुटलेले भांडे व टायर आदींचा समावेश असून यात डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे याची वेळीच काळजी घेण्यासाठी माठातील पाणी झाकून ठेवावे व अंग झाकेल एवढ्या कपड्यांचा वापर करावा. या आजाराची उत्पत्ती एडिस नावाच्या डासापासून होत असल्याने याची ओळख पटवून उपाययोजना करावी, असे उद्‌बोधन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यू