महिला काँग्रेसची भाजपा कार्यालयासमोर निदर्शने

By Admin | Updated: April 5, 2015 02:08 IST2015-04-05T02:08:16+5:302015-04-05T02:08:16+5:30

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केले.

Demonstrations before the BJP office of the women's Congress | महिला काँग्रेसची भाजपा कार्यालयासमोर निदर्शने

महिला काँग्रेसची भाजपा कार्यालयासमोर निदर्शने

वर्धा : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर निदर्शने केली.
केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता महिला काँग्रेसच्यावतीने सदभावना भवनातून मोर्चा काढण्यात आला. महिलांचा मोर्चा भाजपा कार्यालयावर येणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यावेळी महिलांनी सदर केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला असता पोलिसांनी महिलांना स्थानबद्ध करून त्यांची सुटका करण्यात आली.
या मोर्चात महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे, सभापती कुंदा भोयर, माजी सभापती नलिनी भोयर, देवळी शहर अध्यक्ष राजेश्री देशमुख, पुलगाव शहर अध्यक्ष रंजना पवार, उपाध्यक्ष पुष्पा खडसे, अर्चना मुन, छाया पुडके, शिला दाहीर, ढोके, सालंकार, पानबुडे, वादाफळे, लांबट, वेणु गायकवाड, आशा भुजाडे, मंगला इंगळे, उज्वला राऊत, वहीदा शेख, जया गायधने यांच्यासह महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations before the BJP office of the women's Congress