शौचालय बांधकाम व वृक्ष लागवडीच्या चौकशीची मागणी

By Admin | Updated: February 15, 2015 01:48 IST2015-02-15T01:48:17+5:302015-02-15T01:48:17+5:30

कुरझडी (फोर्ट) येथील ग्रा़पं़ झालेल्या गैरप्रकाराबाबत गटविकास अधिकारी वर्धा यांच्याकडे तक्रार करण्यात आली़ यावरून चौकशीही झाली; ...

Demand for toilets construction and tree plantation inquiry | शौचालय बांधकाम व वृक्ष लागवडीच्या चौकशीची मागणी

शौचालय बांधकाम व वृक्ष लागवडीच्या चौकशीची मागणी

वर्धा : कुरझडी (फोर्ट) येथील ग्रा़पं़ झालेल्या गैरप्रकाराबाबत गटविकास अधिकारी वर्धा यांच्याकडे तक्रार करण्यात आली़ यावरून चौकशीही झाली; पण त्यात कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल देण्यात आला़ यामुळे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करीत जि़प़ मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली़ या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़
कुरझडी येथील ग्रा़पं़ ने शासकीय जमीन सर्वे क्ऱ १९९ मधील बाभळीचे वृक्ष तोडले़ यासाठी तत्पूर्वी ग्रामसभेमध्ये परवानगी देण्यात आली होती; पण सध्याच्या समितीने सर्वे क्ऱ १९९ व्यतिरिक्त सर्व्हे क्ऱ ३१९ मधील बाभळीची झाडेही तोडलीत़ ही झाडे लिलाव पद्धतीने तोडण्याची मागणी होती; पण तसे न करता ग्रा़पं़ कमिटीने ठरविलेल्या किमतीत देण्यात आली़ स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत याबाबत विचारणा केली असता सरपंच, उपसरपंच यांनी चार गाड्या लाकूड विकल्याची माहिती दिली़ याचे एकूण वजन ३० टन २५ किलो असल्याचे सांगण्यात आले; पण जळावू लाकडाच्या एका गाडीबाबत माहिती दडविण्यात आली़ यातील पाच टन लाकूड परस्पर विकण्यात आले़ याबाबत विचारणा केली असता सदर रक्कम ग्रा़पं़ च्या बँक खात्यात केली नसल्याचे सचिवांनी सांगितले़ यातील ५ हजार रुपये शाळेला देण्यात आल्याची माहिती सरपंच, उपसरपंच यांनी दिली़ शिवाय साऊंड स्पीकर सेट खरेदी केल्याचे सभेत सांगण्यात आले़ यात पदाचा दुरूपयोग करून ग्रा़पं़च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप माजी ग्रा़पं़ सदस्य नरेश गावंडे यांनी केला़ या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नरेश गावंडे व ग्रामस्थांनी जि़प़ मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रारीतून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Demand for toilets construction and tree plantation inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.