लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावा खरेदी व्हावी म्हणून पुलगाव येथील बाजार समितीमध्ये नाफेडचे केंद्र सुरु केले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांनी नाव नोंदविले असून त्यानुसार शेतकऱ्यांना बोलावण्यात येते. मात्र, आता या केंद्रावर शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे मागितले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी विक्री संघाकडे एप्रिल महिन्यात आपला शेतमाल विक्रीसाठी सातबारा, आधार कार्ड, बॅक पासबूक देऊन नोंदणी केली. त्यानुसार मे व जून महिन्यात शेतकऱ्यांना संदेश पाठवून किंवा दुरध्वनीव्दारे संपर्क साधून शेतमाल आणण्यास सांगितले जात आहे. शेतकरी नाफेड खरेदी केंद्रावर शेतमाल घेवून गेल्यावर नाफेडचे कर्मचारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देतात. शेतकऱ्यांना बोलावल्यांनतरही आज नाही, उद्या या, उद्या नाही परवा या, असे सांगून परतवून लावतात. तसेच काहींच्या शेतमालावर आक्षेप घेवून त्याचा माल घेण्यास टाळाटाळ करतात. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नंतर पैशाची मागणी करुन तुमचा माल चांगल्या दरात विकून देतो, असे सांगितले जाते. असाच प्रकार खातखेडा येथील शेतकरी नंदकिशोर काळे या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला. त्यांनी पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेड खरेदी केंद्रावर चणा विक्रीकरिता आणला होता. त्यांनाही सुरुवातीला आज, उद्या व परवा असे दिवस देवून टाळाटाळ केली. पण, या दरम्यान इतर शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी सुरु आहे, हे शेतकरी काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी नाफे डच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा एका कर्मचाऱ्याने काळे यांना एका क्विंटलमागे दीडशे रुपयाची मागणी केली. काळे यांनी चणा काट्यावर आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करण्यात आली. याबाबत वरिष्ठांना विचारणा केल्यावर असभ्य वागणूक दिल्याचा आरोप नंदकिशोर काळे यांनी केला आहे. यासंदर्भात कृषीमंत्री, पणनमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देवून शेतकऱ्यांची नम थांबवावी, अशी मागणी केली आहे.माझ्या शेतातील चणा नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला असता कर्मचाऱ्यांनी एका क्विंटलवर दीडशे रुपयांची अतिरिक्त मागणी केली. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून हा प्रकार बंद करुन योग्य कार्यवाही करावी.नंदकिशोर काळे, शेतकरी, खातखेडा.चण्याची विक्री करण्याकरिता कोणत्याही शेतकऱ्याला मी पैशाची मागणी केली नाही. माझ्या मागे कर्मचाऱ्याने काय केले ते मी सांगू शकत नाही.प्रवीण यादव, ग्रेडर, खरेदी विक्री संघ.आम्ही आमचा परिसर चणा खरेदीसाठी नाफेडला उपलब्ध करून दिली. आमचा या चणा खरेदी प्रकरणात काही संबंध नाही.मोहन हावरे, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.
नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्याला अतिरिक्त पैशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST
शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी विक्री संघाकडे एप्रिल महिन्यात आपला शेतमाल विक्रीसाठी सातबारा, आधार कार्ड, बॅक पासबूक देऊन नोंदणी केली. त्यानुसार मे व जून महिन्यात शेतकऱ्यांना संदेश पाठवून किंवा दुरध्वनीव्दारे संपर्क साधून शेतमाल आणण्यास सांगितले जात आहे. शेतकरी नाफेड खरेदी केंद्रावर शेतमाल घेवून गेल्यावर नाफेडचे कर्मचारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देतात.
नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्याला अतिरिक्त पैशाची मागणी
ठळक मुद्देपुलगाव येथील प्रकार : शेतकऱ्यांची होतेय ससेहोलपट