रावण दहन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By Admin | Updated: October 5, 2016 01:44 IST2016-10-05T01:44:17+5:302016-10-05T01:44:17+5:30
विजयादशमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ‘रावण दहन’ कार्यक्रम करण्यात येता. हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीचा अपमान असून....

रावण दहन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा: विजयादशमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ‘रावण दहन’ कार्यक्रम करण्यात येता. हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीचा अपमान असून असा कार्यक्रम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार देण्यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात येते. तरीह जिल्ह्यात असे कार्यक्रम होतात. सदर कृत्य संविधान विरोधी असल्याचे म्हणत ‘रावण दहन’सारख्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम १५३, १५३ (अ), २९५, २९५ (अ) आणि २९८ नुसार तसेच मुंबई पोलीस अॅक्ट कलम १३१, १३४ आणि कलम १३५ चे उल्लंधन होत असतानाही सदर कार्यक्रम आयोजकांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही आदिवासी परिषदेने केला आहे. यंदा निवेदनाची दखल घेत परवानगी देणाऱ्यांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)