वर्धेच्या खाद्य पदार्थाची दिल्लीकरांना भुरळ

By Admin | Updated: January 18, 2015 23:17 IST2015-01-18T23:17:18+5:302015-01-18T23:17:18+5:30

सेवाग्राम आश्रमातील प्राकृतिक आहार केंद्रातील कोलाम जमातीच्या पदार्थाचा स्टॉल खाद्य महोत्सवात सहभाग आहे. यात बाजरा भाकरी, बाजऱ्याची खिचडी, बाजऱ्याचा वडा, झुनका,

Delhi fond of Wardha's food | वर्धेच्या खाद्य पदार्थाची दिल्लीकरांना भुरळ

वर्धेच्या खाद्य पदार्थाची दिल्लीकरांना भुरळ

वर्धा: सेवाग्राम आश्रमातील प्राकृतिक आहार केंद्रातील कोलाम जमातीच्या पदार्थाचा स्टॉल खाद्य महोत्सवात सहभाग आहे. यात बाजरा भाकरी, बाजऱ्याची खिचडी, बाजऱ्याचा वडा, झुनका, कडी या खाद्य पदार्थांनी दिल्लीकर खाद्य शौकीनांची पसंती मिळवली आहे.
केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने देशातील विविध राज्यातील आदिवासी जमातीच्या खाद्यपदार्थ महोत्सवाला दिल्लीच्या कॅनॉट प्लेस भागातील बाबाखडगसिंह मार्गावरील राजीव गांधी हस्तकला भवनाच्या प्रांगणात सुरुवात झाली़ केंद्रीय आदिवासी विकासमंत्री जिओल ओराम यांच्या हस्ते या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन झाले़ यावेळी त्यांनी स्टॉलला भेट देवून खाद्य पदार्थांबद्दल माहिती जाणून घेतली.
राज्यातील कोलाम जमातीच्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल या महोत्सवात सहभागी झाला आहे़ वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात प्राकृतिक आहार केंद्रात कार्यरत गंगुबाई सरपाम, रूपा चन्नोळे, रवी मेहरे व मोहनीश पोतदार या स्टॉलवर सेवा देत आहेत़ या स्टॉलला भेट देणाऱ्या दिल्लीकर खाद्य शौकीनांना ते कोलाम जमातीच्या खाद्य पदार्थांची माहिती देत पारंपारिक पद्धतीने सजवलेली भोजन थाळी वाढताहेत़ येथे महाराष्ट्रासह इतर राज्यातील स्टॉलही लावण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Delhi fond of Wardha's food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.