सेलू विकास चौकातील अतिक्रमण हटवा
By Admin | Updated: April 28, 2016 02:02 IST2016-04-28T02:02:44+5:302016-04-28T02:02:44+5:30
सेलू शहराचा मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या विकास चौकात रस्त्यालगत अतिक्रमण करण्यात आले आहे.

सेलू विकास चौकातील अतिक्रमण हटवा
युवा सेनेचे तहसील प्रशासनाला साकडे
घोराड : सेलू शहराचा मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या विकास चौकात रस्त्यालगत अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी युवा सेनेने केली. याबाबत बुधवारी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना निवेदन सादर करण्यात आले.
विकास चौकात अतिक्रमण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना निवेदन दिले. यात अतिक्रमणामुळे होणारे संभाव्य अपघात पाहता पुढाकार घ्यावा आणि अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही १ मे महाराष्ट्र दिनापर्यंत करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा कधीही तहसील कार्यालयापूढे शिवसेनेचे युवा सैनिक बैठा सत्याग्रह करतील, असा इशारा देण्यात आला. हे अतिक्रमण तहसील कार्यालयाच्या अगदी समोर आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झाला आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी, सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंत्यांनाही निवेदन पाठविण्यात आले. यावेळी सुनील पारसे, प्रशांत झाडे, पंकज तडस, गजू कैकाडे, अजय उईके, सुनील तिमांडे, आदी उपस्थित होते.(वार्ताहर)