क्रीडा संकुल ठरतेय शोभेची वास्तू

By Admin | Updated: January 10, 2015 23:01 IST2015-01-10T23:01:24+5:302015-01-10T23:01:24+5:30

शासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथील तालुका क्रीडा संकुलाची वास्तू शोभेची ठरत आहे़ प्रशासकीय उदासिनतेमुळे चांगल्या उपक्रमाला गालबोट लागत आहे़ ही वास्तू कोणत्याही प्रकारची सुविधा

Decoration Vault of Sports Complex | क्रीडा संकुल ठरतेय शोभेची वास्तू

क्रीडा संकुल ठरतेय शोभेची वास्तू

हरिदास ढोक - देवळी
शासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथील तालुका क्रीडा संकुलाची वास्तू शोभेची ठरत आहे़ प्रशासकीय उदासिनतेमुळे चांगल्या उपक्रमाला गालबोट लागत आहे़ ही वास्तू कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने शोभेची वास्तू ठरत आहे़ तालुका क्रीडा अधिकाऱ्याच्या तुघलकी कारभारामुळे खेळाडुंसह अधिकारीही त्रस्त झाले आहे़
स्थानिक नगर परिषद ले-आऊट येथे एक कोटी रुपये खर्च करून तालुका क्रीडा संकुलाची वास्तू उभारण्यात आली आहे; पण येथे कुठेही खेळाची व्यवस्था करण्यात आलेली नाही़ यामुळे खेळाडूंचा हिरसमोड होत आहे. संकुलाची वास्तू नेहमीच बंद राहत असल्याने टेबल टेनिस व बॅटबिंटन कोर्ट यासारख्या खेळांपासून खेळाडुंना वंचित राहावे लागत आहे. मल्लखांब, डबलबार, सिंगलबार आदींची व्यवस्था नसल्याने सरावासाठी स्थानिक आखाड्यातील साहित्यांचा आधार खेळाडुंना घ्यावा लागत आहे. कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल या खेळांसाठी अधिकृत पीच (ग्राऊंड) तसेच रनिंग ट्रॅक तयार नसल्याने खेळाडुंचा उत्साह मारला जात आहे. ग्राऊंडवर बॉलची व्यवस्था नसल्यसाने खेळाडूंना स्वत:च बॉल आणून काम भागवावे लागत आहे.
क्रीडा संकुल परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज व प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम करण्यात आलेले नाही़ संकुलाला सुरक्षा भिंत नसल्याने परिसरात मोकाट गुरांचा संचार असतो़ पिण्याच्या पाणीची टाकी नियमित भरली जात नाही़ यामुळे खेळाडुंना परिसरातील घरांचा आधार घ्यावा लागत आहे. क्रीडा प्रशिक्षक गांडोळे यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रशिक्षक व कर्मचारी संकुलावर उपस्थित राहत नसल्याने अडचणी आहे. तालुका क्रीडा अधिकाऱ्याचे पद पूर्णवेळ व वर्ग-२ मध्ये मोडणारे असताना रंगारी या कधीकाळीच कार्यालयात येतात़ याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनेसाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. यात पं.स. गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी, बांधकाम विभाग व इतर अधिकारी सदस्य आहेत; पण संकुलाच्या कार्यपद्धतीवर संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत खेळाडुंना प्रोत्साहन देण्याकरिता क्रीडा संकुल सुरळीत करणे गरजेचे आहे़

Web Title: Decoration Vault of Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.