हिंदू महासभेला दहशतवादी संघटना घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:11 IST2019-02-03T00:10:38+5:302019-02-03T00:11:54+5:30
हुतात्मादिनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पिस्तुलातून प्रतीकात्मक गोळ्या झाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वाघाडी फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार दीपक कारंडे यांना निवेदन देत हिंदू महासभा या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करा व निंदनीय कृत्य करणाऱ्या विकृतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

हिंदू महासभेला दहशतवादी संघटना घोषित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : हुतात्मादिनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पिस्तुलातून प्रतीकात्मक गोळ्या झाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वाघाडी फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार दीपक कारंडे यांना निवेदन देत हिंदू महासभा या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करा व निंदनीय कृत्य करणाऱ्या विकृतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
३० जानेवारी २०१९ ला सारे जग महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ हुतात्मा दिनी श्रद्धांजली देत असताना अलीगड येथे हिंदू महासभेच्या विकृत सदस्यांनी महात्मा गांधीजींचा प्रतीकात्मक पुतळा उभारून निर्लज्जपणे नकली पिस्तुलाच्या माध्यमातून तीन गोळ्या झाडल्या. हे कृत्य निंदनीय असून अशा विकृतींना वेळीच त्यांची जागा दाखविणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गांधी अहिंसेचे प्रतीक असून आदरस्थानी आहेत. त्यांची विटंबना ही देशाचीच विटंबना आहे. हिंदू महासभेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे व असे विकृत कृत्य करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनातून वाघाडी फाऊंडेशनच्या निर्मल भोयर, मंगेश थूल, पलाश लाजूरकर, रॉबिन नांदगावे, नवनीत गंगशेट्टीवार, सूरज येलगुंडे, हेमंत डगवार, गौरव दोंदल, विवेक थूल, राहुल लाजूरकर आदींनी केली आहे.