आरटीई अंतर्गत प्रवेशाचा आज फैसला
By Admin | Updated: May 26, 2016 00:23 IST2016-05-26T00:23:53+5:302016-05-26T00:23:53+5:30
आर्थिक तसेच दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांला चांगल्या प्रतिच्या शाळेमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता राज्य सरकारने पाच वर्षांअगोदर ....

आरटीई अंतर्गत प्रवेशाचा आज फैसला
१ हजार ५५९ जागा : आठही तालुक्यातील जागांची सोडत निघणार
वर्धा : आर्थिक तसेच दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांला चांगल्या प्रतिच्या शाळेमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता राज्य सरकारने पाच वर्षांअगोदर कायदा करून शाळेतील पटसंख्येच्या २५ टक्के जागा राखीव करण्यात आल्या. याची सोडत गुरुवारी होणार आहे.
या उपक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासन शिक्षण संस्थांना अदा करणार आहे. यावर्षी आरटीई अंतर्गत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. यातील शेवटचा टप्पा म्हणजेच याची सोडत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये घोषित केल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नर्सरी व वर्ग १ ला करिता एक हजार ५५९ एवढ्या जागा असून याकरिता एकूण एक हजार ६७४ अर्ज प्राप्त झाले आहे. यामध्ये वर्धा- ५३४, सेलू-११४, देवळी -१८५, हिंगणघाट - ३९४, समुद्रपूर-२१, आर्वी - २२४, आष्टी ९० तर कारंजा येथून ११२ अर्ज प्राप्त झाले आहे. या सोडतीमधून पहिला वर्ग व नर्सरीकरिता एक हजार ५५९ एवढ्या जागा भरण्यात येणार आहे. यात पहिला वर्ग एक हजार ७२ तर नर्सरीच्या ४८७ मुला-मुलींना आरटीईअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.
यात समुद्रपूर तालुक्यात पहिला वर्ग ७८ तर नर्सरी ०, कारंजा घाडगे तालुक्यात पहिला वर्ग ५८ तर नर्सरी ३०, हिंगणघाट तालुक्यात पहिला वर्ग ३०१ तर नर्सरी २९, सेलू तालुक्यात पहिला वर्ग ९८ तर नर्सरी ७७, वर्धा तालुक्यात पहिला वर्ग १७३ तर नर्सरी ३१८, आर्वी तालुक्यात पहिला वर्ग १६१ तर नर्सरी ०, आष्टी तालुक्यात पहिला वर्ग ३७ तर नर्सरी २९ तर देवळी तालुक्यात पहिला वर्ग १६६ तर नर्सरी ४ जागेवर या सोडतीअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या होणाऱ्या सोडतीला पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.(शहर प्रतिनिधी)