१२०० शेतकऱ्यांना १.४३ कोटींची कर्जमाफी

By Admin | Updated: December 6, 2015 02:16 IST2015-12-06T02:16:52+5:302015-12-06T02:16:52+5:30

सावकारी कर्जमाफीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी चौथी बैठक झाली.

Debt Waiver of Rs. 1.43 Crore To 1200 Farmers | १२०० शेतकऱ्यांना १.४३ कोटींची कर्जमाफी

१२०० शेतकऱ्यांना १.४३ कोटींची कर्जमाफी


वर्धा : सावकारी कर्जमाफीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी चौथी बैठक झाली. यात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी १ हजार १९४ शेतकऱ्यांना १.४३ कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. याची माहिती आठही संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयात देण्यात आली आहे.
जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या तीन बैठकीत एकूण १ हजार ८६० शेतकऱ्यांना एकूण २ कोटी ४० लाख ५१ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. यात नव्याने जाहीर १ हजार १९४ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. याची माहिती प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात व उपनिबंधक कार्यालयात देण्यात आली आहे. कर्जमाफीचा प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात येत असलेल्या उपनिबंधक कार्यालयात जात याची माहिती करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Debt Waiver of Rs. 1.43 Crore To 1200 Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.