शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपे-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:43 IST

पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाला भरधाव येणाºया दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजतादरम्यान घडला. या अपघातातील दोन्ही वाहने शहर पोलिसांनी जप्त केली आहे.

ठळक मुद्देमहिलाश्रम परिसरातील घटना : दोन्ही वाहने केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाला भरधाव येणाºया दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजतादरम्यान घडला. या अपघातातील दोन्ही वाहने शहर पोलिसांनी जप्त केली आहे.महेश भारत भोयर(२३) रा. डॉक्टर कॉलनी वरुड, असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जगदीश जयंतकुमार भस्मे रा. कान्हापूर यांचा एम.एच.४९ एटी. ०३७२ क्रमाांकाचा अ‍ॅपे पंक्चर झाल्याने महिलाश्रमजवळ दुरुस्त करून ते रस्त्याच्या चुकीच्या बाजुने जात होते. याच दरम्यान एम.एच.३२ ऐबी.४४९८ क्रमांकाच्या दुचाकीवर चौघजण सेवाग्रामकडून येत होते. या भरधाव दुचाकीस्वाराने अ‍ॅपेला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत अ‍ॅपेच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक जगदिश भसमे हाही जखमी झाला. तसेच दुचाकीवरील महेश भोयर यासह आणखी एकाला गंभीर मारला लागला असून इतर दोघे किरकोळ जखमी झाले. महेशसह गंभीर जखमी असलेल्या मित्राला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता महेशचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्याच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.याप्रकरणी अ‍ॅपे चालक जगदिश भसमे यांच्या तक्रारीवरुन अपघाताची नोंद घेतली असून दोन्ही वाहने पोलीसांनी जप्त केली आहे. या अपघात प्रकरणात एकाचा मृत्यू झाल्याने आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू