नगर पालिका कर्मचाऱ्याची हत्या

By Admin | Updated: May 11, 2015 01:40 IST2015-05-11T01:40:11+5:302015-05-11T01:40:11+5:30

येथील नगर पालिकेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रवी रामगोपाल चंदीतारा (३५) रा. स्वीपर कॉलनी यांची रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नेहरू वॉर्ड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली.

The death of the municipality employee | नगर पालिका कर्मचाऱ्याची हत्या

नगर पालिका कर्मचाऱ्याची हत्या

हिंगणघाट : येथील नगर पालिकेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रवी रामगोपाल चंदीतारा (३५) रा. स्वीपर कॉलनी यांची रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नेहरू वॉर्ड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून हिंगणघाट पोलिसांनी सन्नी सतीजा रा. गांधी वॉर्ड या संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी रवीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सन्नी सतीजा याने रवी याला बोलावून मोटरसायकलवर बाहेर घेवून गेला. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास रवी गंभीर जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
रवीच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद, पीएसआय नाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सन्नीच्या घरासमोरील रस्त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. मृतकाच्या अंगावरील जखमा लोखंडी रॉडच्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मृतक सन्नीच्या घरी गेल्या दोन दिवसापासून येत असल्याची माहिती आहे. दोघात वाद उत्पन्न होवून ही गंभीर स्वरूपाची घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी सन्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या घटनेत आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचे बोलल्या जात आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The death of the municipality employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.