न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान मृत्यू

By Admin | Updated: August 31, 2015 01:59 IST2015-08-31T01:59:10+5:302015-08-31T01:59:10+5:30

दारू पिऊन आढळल्याने पोलिसांनी अटक करून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा कारागृहात रवानगी झालेल्या न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. ..

Death during the treatment of judicial ban | न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान मृत्यू

न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान मृत्यू

दारू पिऊन धिंगाणा घातल्या प्रकरणी केली होती कारागृहात रवानगी
वर्धा : दारू पिऊन आढळल्याने पोलिसांनी अटक करून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा कारागृहात रवानगी झालेल्या न्यायाधीन बंदीचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. रामचंद्र मुते (४०) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातल्या प्रकरणी ११ आॅगस्ट रोजी शहर पोलिसांनी रामचंद्र मुते याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली. येथे असताना शनिवारी मध्यरात्री त्याची प्रकृती खालावली. याची माहिती कारागृह व्यवस्थापनास कळताच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची आरोग्य तपासणी करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा सकाळी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती तहसीलदारांना देत त्याचा घटनास्थळीच पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती कारागृहातून देण्यात आली.
त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारण पुढे येईल असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. मृतक रामचंद्र याला दारू पिऊन परिसरात धिंगाणा घालण्याच्या कारणावरून यापुर्वीही कारागृहात पाठविण्यात आले असल्याचे कारागृहातून सांगण्यात आले आहे. त्याला रोजच दारू पाहिजे असल्याने त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज कारागृह व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Death during the treatment of judicial ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.