उपवनसंरक्षकांच्या उपस्थितीत मृत बिबट्याला दिला अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:22+5:30

बिबट्याच्या शिकारीमुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय जंगली वराह पकडण्यासाठी कुणी जाळे लावले होते याची माहिती सध्या वनविभागाचे कर्मचारी परिसरातील शेतकऱ्यांकडून घेत आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही वनविभागाला गवसले नसले तरी घटनास्थळावर एक मृत जंगली वराह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला आहे.

The dead leopard was set on fire in the presence of forest rangers | उपवनसंरक्षकांच्या उपस्थितीत मृत बिबट्याला दिला अग्नी

उपवनसंरक्षकांच्या उपस्थितीत मृत बिबट्याला दिला अग्नी

ठळक मुद्देतीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली/खरांगणा (मो.) : खरांगणा (मो.) वनपरिक्षेत्रातील सुकळी उबार शिवारात जंगली वराहाला पकडण्यासाठी वापरण्यात येणाºया जाळ्याचा वापर करून बिबट्याची शिकार करण्यात आली. ही घटना सोमवारी उघडकीस आली असून मंगळवारी शवविच्छेदनाअंती उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिबट्याच्या शिकारीमुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय जंगली वराह पकडण्यासाठी कुणी जाळे लावले होते याची माहिती सध्या वनविभागाचे कर्मचारी परिसरातील शेतकऱ्यांकडून घेत आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही वनविभागाला गवसले नसले तरी घटनास्थळावर एक मृत जंगली वराह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला आहे. तसेच घटना स्थळावरून जाळे व एक भाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उपवनसंरक्षक सुनील शर्मा, एसीएफ व्ही. एन. ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हण यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. पराते, डॉ. ए. यु. पाटील, डॉ. एच. डी. अंधारे यांनी मृत बिबट्या व जंगली वराहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत बिबट्या व जंगली वराहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिकारी सराईत नाहीच?
बिबट्याची शिकार करणाºयांनी जाळ्यात बिबट्या अडकताच घटना स्थळावरून यशस्वी पोबारा केला. शिवाय त्यांचा शोध सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. जर हे शिकारी सराईत असते तर त्यांनी बिबट्याचे अवयव कापून नेले असते. ते सराईत शिकारी नसल्यानेच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असावा, असा कयास वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. असे असले तरी लवकरच आरोपींना जेरबंद करू असा विश्वास वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

नमुने प्रयोगशाळेत पाठविणे शिल्लक
शवविच्छेदन करणाºया पशुवैद्यकीय अधिकाºयांनी मृत बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान मृत बिबट्याच्या शरिरातील काही अवयवाचे नमुने घेतले आहे. हे नमुने देहरादून, हैद्राबाद किंवा नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण वनविभागाला माहिती होणार आहे.

परिसरात वन्यप्राण्यांचा असतो मुक्तसंचार
सुकळी उबार हे आदिवासी बहूल गाव आहे. शिवाय सुकळी उबार शिवारातच सुकळी लघु प्रकल्प असून झुडपी जंगल असल्याने या परिसरात हरिण, रोही, अस्वल, बिबट्या आदी वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार राहत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The dead leopard was set on fire in the presence of forest rangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.