मेंढपाळांना आले सुगीचे दिवस

By Admin | Updated: May 15, 2014 01:42 IST2014-05-15T01:42:47+5:302014-05-15T01:42:47+5:30

जिल्ह्यात राजस्थानी मेंढपाळ अवतरले आहेत. आंजी (मोठी) परिसरातही शेतीची सुपिकता वाढण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या शोधत असल्याचे दिसते.

Day of the harvest came to the shepherds | मेंढपाळांना आले सुगीचे दिवस

मेंढपाळांना आले सुगीचे दिवस

४0 टक्के शेतकर्‍यांची कामे आटोपली

जमिनीची सुपिकता वाढविण्याचा प्रयत्न : मेंढय़ा बसविण्याचे एका रात्रीचे दर दीड हजार रुपये

वर्धा : जिल्ह्यात राजस्थानी मेंढपाळ अवतरले आहेत. आंजी (मोठी) परिसरातही शेतीची सुपिकता वाढण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या शोधत असल्याचे दिसते. नापिकीवर मात करण्यासाठी शेतात राजस्थानी शेळ्या, मेंढय़ा बसवून शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसते. शेतात मेंढय़ा बसविण्यासाठी शेतकर्‍यांना एका दिवसाचे दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत.
परिसरातील ७0 टक्के शेतकर्‍यांकडे दोन बैलांच्या वर जनावरे नाही. यामुळे त्यांना पूरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध होत नाही. दिवसेंदिवस रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत खालावत आहे. शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडल्याने ते खरेदी करणे कठीण जात आहे. शेतकर्‍यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे. पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी झाला असून अनेकांनी आत्महत्या केल्यात. यामुळे बरेच शेतकरी आता रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताकडे वळले आहेत; पण त्यासाठी शेणखत वापरणे आवश्यक आहे. शेतकरी शेणखताकडे वळल्याने शेणखताचेही दर चांगलेच वधारलेत. उन्हाळ्यात अनेक शेतकरी शेणखत बैलबंडी वा ट्रॅक्टरच्या हिशेबाप्रमाणे खरेदी करतात; पण लहान शेतकर्‍यांना ते अशक्य आहे. यामुळे शेतकरी आपल्या शेतात शेळ्या, मेंढय़ा बसविण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे शेतीची सुपिकता वाढण्यास मदत होते. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. काहींच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी सुरू असल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)

४0 टक्के शेतकर्‍यांची कामे आटोपली

■ जवळपास ४0 टक्के शेतकर्‍यांची नांगरणीची कामे झाली आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात राजस्थानी मेंढपाळ परिसरात डेरेदाखल होतात.
■ शेतकर्‍यांच्या शेतात मेंढय़ांचा कळप बसवितात. मेंढय़ांना चारा व मालकांना पैसेही मिळतात.
■ एका रात्री मेंढय़ा बसविल्यास त्यांना दीड हजार रुपये मिळतात. सुपिकता वाढविण्यासाठी शेतात मेंढय़ा बसविण्यासच शेतकरी पसंती देताना दिसतात.

Web Title: Day of the harvest came to the shepherds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.