कोरोनाची गुढीपाडवा सणावर गडद छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:11+5:30

सुवर्णालंकार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. कोरोनामुळे शुभ मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही करता येणार नाही. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी आनंदात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो. दारी गुढी उभारली जाते.

Dark shadow at the Gudi Padwa festival of Corona | कोरोनाची गुढीपाडवा सणावर गडद छाया

कोरोनाची गुढीपाडवा सणावर गडद छाया

Next
ठळक मुद्देबाजारपेठच बंद असल्याने साधेपणाने साजरा होणार सण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गुढीपाडवा...सुख, समृद्धी आणि मांगल्याचा सण...हिंदू नववर्षाची सुरुवात अन् साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण... बुधवारी म्हणजे आज हा सण महाराष्ट्रासह देशातील वेगवेगळ्या भागात साजरा होणार आहे. मात्र, मांगल्याची आणि समृद्धीची कामना करणाऱ्या या सणावर कोरोनाचे गडद सावट असून, सणासाठी खरेदीची दुकाने बंद असल्याने घरच्या घरी अगदी साधेपणाने गुढीपाडवा साजरा होणार आहे. सुवर्णालंकार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. कोरोनामुळे शुभ मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही करता येणार नाही.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी आनंदात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो. दारी गुढी उभारली जाते.
घरांमध्ये, कार्यालयांमध्ये गुढी उभारून तिला गोड नैवैद्य दाखविला जातो. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरविली जाते. या दिवशी घरोघरी जात आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन केले जाते. मात्र, कोरोनामुळे लोकांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असून या दिवशी नवीन वस्तूची खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्णलंकार आदीची खरेदी होते. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सरकारने आता संचारबंदीसारखे कठोर पाऊल उचलल्याने गुढीपाडवा घरच्या घरीच साजरा करावा लागणार आहे. राज्ळ शासनाने सोमवारपासून संचारबंदी लागू केल्याने बाजारात खरेदीदारांअभावी शुकशुकाट आहे.


पूजेच्या साहित्याची दुकाने बंद
गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी, रेशमी वस्त्र अथवा साडी, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी, तांब्याचा गडू, रांगोळी, हळदी-कुंकू, अगरबत्ती, कापूर, निरांजन अशा पूजेच्या साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे शहरात पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लोकांची वर्दळ नाही.

Web Title: Dark shadow at the Gudi Padwa festival of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.