गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटांत संघर्ष
By Admin | Updated: September 22, 2014 23:23 IST2014-09-22T23:23:31+5:302014-09-22T23:23:31+5:30
गणपती विसर्जनाच्या वेळेस नाचगाण्याच्या कारणावरून युवकांच्या दोन गटात वाद उफाळून आला. यात झालेल्या हाणामारीत लाठ्याकाठ्यांनी मारुन व धारदार शस्त्रांनी जखमी करण्यात आले.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटांत संघर्ष
देवळी : गणपती विसर्जनाच्या वेळेस नाचगाण्याच्या कारणावरून युवकांच्या दोन गटात वाद उफाळून आला. यात झालेल्या हाणामारीत लाठ्याकाठ्यांनी मारुन व धारदार शस्त्रांनी जखमी करण्यात आले. स्थानिक न.प. ले-आऊट येथे काल रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. देवळी पोलीसांनी दोन्ही गटांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये दोन्ही गटातील युवक धुंदीत नाचत असताना फिल्मी गाण्यांच्या फरमाईशवरून हा वाद उफाळला. यामध्ये आरोपी अनमोल गणवीर, श्याम कन्नाके, रणजीत गणवीर व मोनू काकण सर्व राहणार न. प. ले-आऊट देवळी यांनी संगनमत करून महेश वसंत जोशी (३४) याला धारदार शस्त्रांनी मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेचा वचपा काढण्याकरिता म्हणून जोशी याच्या सहकाऱ्यांनी सुखद बाबाराव गणवीर (२७) रा. न. प. ले-आऊट याच्या घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण जखमी केले. देवळी पोलिसांनी या घटनेतील आरोपी अविनाश धपके, कार्र्तिक धपके, पवन आदमने व मनोज पहाडे सर्व रा. ठाकरे चौक यांच्या विरूद्ध भांदविच्या कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर डब्ल्यु ४/२५ भारतीय हत्यार कायदा या अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच पहिल्या घटनेतील आरोपींवर भांदविच्या ३२४, ५०६, ३४ तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)