अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: March 11, 2015 01:45 IST2015-03-11T01:45:20+5:302015-03-11T01:45:20+5:30
तालुक्यात डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. डास पळविण्यासाठी अगरबत्ती व कॉईल्सचा वापर वाढल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव
सेलू : तालुक्यात डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. डास पळविण्यासाठी अगरबत्ती व कॉईल्सचा वापर वाढल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
सांडपाणी वाहुन जाण्यासाठी गावागावांमध्ये बांधण्यात आलेल्या नाल्या बहुतांश ठिकाणी गाळांनी तुंडूब भरल्या आहेत. या कारणाने डासांची उत्त्पत्ती झपाट्याने होत आहे. सायंकाळच्या वेळी घरातील मंडळीना डास निवांत बसु देत नाही. यामुळे फॅन चा आसरा घ्यावा लागत आहे. विजेची बचत करण्याचा मानस असला तरी डास चावल्यास हिवताप होऊ नये म्हणून विजेचा वापर करावाच लागत आहे. तरीही डास ऐकायला तयार नसल्याने डास घरातून पळविण्यासाठी अगरबत्त्या वापराव्या लागत आहे.
डासाचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. असे असतानाही तालुक्यातील आरोग्य विभागाचे याकडे फारसे लक्ष दिसत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहे. धुरळणी साठी असणाऱ्या फॉगिंग मशीनची बहुतांश ग्रामपंचायतीनी खरेदी केली असली तरी त्या मशिनी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येते.
डी. डी. टी. ची फवारणी काल बाह्य झाली आहे. त्यामुळे थंडी वाजून ताप येण्याच्या रुग्णांची गर्दी खासगी रुग्णालयांमध्ये वाढत आहे.
अनेक प्रकारच्या तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ग्रामीण रुगणालयातील बाह्य रुग्ण विभागातही गर्दी दिसून येत आहे. डासाचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊले गावाकडे वळविण्याची गरज आहे. परंतु तसे होत नसल्याने व नाल्यांची सफाई नियमित होत नसल्याने आजाराची शक्यता बळावली आहे. स्थानिक प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. तसेच फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी करण्याची मागणीही होत आहे.(शहर प्रतिनिधी)