भीषण आगीत चार लाखांचे नुकसान
By Admin | Updated: May 24, 2016 02:11 IST2016-05-24T02:11:56+5:302016-05-24T02:11:56+5:30
स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या संजु पुरोहित व राजेंद्र कोचर यांच्या गोळ्याला आग लागली.

भीषण आगीत चार लाखांचे नुकसान
कचरा पेटविण्यातून आग : गोठ्यातील साहित्य जळून खाक
नाचणगाव : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या संजु पुरोहित व राजेंद्र कोचर यांच्या गोळ्याला आग लागली. यात त्यांचे अंदाज चार लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सांयकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
आग आटोक्यात आणण्याकरिता परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले; मात्र आगीवर ताबा मिळविणे कठीण होत असल्याने पुलगाव येथील सीएडी कॅम्प अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यात सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. येथील नागरिकांनी त्यांच्या घराशेजारी असलेला कचरा जाळला. परंतु हवेच्या ओघोने आग वाढत जात ती येथील संजु पुरोहित यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचली. आगीने पाहता पाहता भीषण रूप धरत गोठ्यातील डायनिंग टेबल, सागवान मयाली, टीनपत्रे आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. या आगीत राजेंद्र कोचर यांच्या मालकीच्या गोठ्यातील सागवन जळून खाक झाले. सीएडी कॅम्पच्या अग्निशामक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळविता यश आले.
प्रारंभी नागरिकांनी पाण्याच्या टँकरच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले. यावेळी नायब तहसीलदार स्रेहल ढोक, तलाठी एम.एम. पवार, बीडी डेहनकर, राऊत, पोलीस उपनिरीक्षक राजुरकर यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.(वार्ताहर)