अल्लीपूर-टाकळी रस्त्याची दैना
By Admin | Updated: April 9, 2017 00:25 IST2017-04-09T00:25:33+5:302017-04-09T00:25:33+5:30
टाकळी (दरणे) ते अल्लीपूर या रस्त्याची अल्पावधीत दैनावस्था झाल्याचे दिसून येते.

अल्लीपूर-टाकळी रस्त्याची दैना
डांबरीकरण नावापुरतेच : रस्त्यावरील दगड पडले उघडे
अल्लीपूर : टाकळी (दरणे) ते अल्लीपूर या रस्त्याची अल्पावधीत दैनावस्था झाल्याचे दिसून येते. रस्त्यावर डांबरीकरणाचा स्तर नाममात्र असून मुरुम व गोटे उघडे पडले आहे. अशा रस्त्यावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना मनस्ताप होतो.
या रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले होते. मात्र अल्पावधीत रस्ता उखडला. रस्त्याची गिट्टी उघडी पडल्याने यावरुन वाहन घसरते. या रस्त्याची स्थिती पाहता येथून चालत जाणे कठीण आहे. या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. या रस्त्याचे मजबुतीकरण करुन डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्याच्या बराचसा भाग खचला. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे. एखादे मोठे वाहन रस्त्याने गेल्यावर धुळ उडते. त्यामुळे वाहन चालकांना दिसनासे होते. त्यामुळे अपघाताचा धोका आहे.(वार्ताहर)