शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आधी कॉम्प्रेसर फुटले नंतर सिलिंडरचा स्फोट, वर्ध्याच्या रामनगर परिसरातील घटनेने खळबळ

By चैतन्य जोशी | Updated: March 25, 2023 12:43 IST

‘लक्ष्मी कॅफे’चे लाखोंचे नुकसान

वर्धा : वेळ सकाळी ८.४५ वाजताची...अचानक बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला...अन् नागरिकांची तारांबळ उडाली. मग काय उपहारगृहातून आगीचे लोळ उठू लागले...आग विझविण्यासाठी धडपड सुरु झाली. पाण्याचा मारा करण्यात आला. अखेर अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पण त्याच वेळेस  उपहारगृहातील फ्रिजचे कॉम्प्रेसर फुटले त्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड लेप्रसी फाऊंडेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. यात उपहारगृह मालकाचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शहरातील रामनगर परिसरातील संततुकाराम वॉर्ड परिसरात रणजित इंगळे यांच्या मालकीचे ‘लक्ष्मी कॅफे’ नामक उपहारगृह आहे. शनिवारी २५ रोजी उपहारागृह बंद होते. सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास उपहारगृहातून जोरदार आवाज आला आणि अचानक बंद दुकानातून धूर अन् आगिचे लोळ निघू लागले. दरम्यान उपहारगृह मालक रणजित इंगळेसह विक्की चांभारे, सागर कठाणे, अनंता कठाणे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान आगीच्या आसीने तिघेही किरकोळ भाजले.

अखेर अग्निशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. लागलेल्या आगीत उपहारगृहातील साहित्याची राखरांगोळी झाली. यात उपहारगृह मालक रणजित इंगळे यांचे लाखोंचे नुकसान झाले. ही घटना शॉर्टसर्किटने झाल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांसह महेश तेलरांधे, पवन राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

स्फोटाचा आवाज अन् नागरिक भयभीत

उपहारगृहात झालेल्या स्फोटामुळे परिसरात मोठ्याने आवाज झाला. हा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक भयभीत होत घराबाहेर पडले. अनेकांच्या घरांच्या खिडक्यां देखील हलल्या. तसेच उपहारगृहातील स्लॅबलाही तडे गेल्याचे दिसून आले.

टॅग्स :fireआगAccidentअपघातwardha-acवर्धा