मुद्रांकांकरिता ग्राहकांची भटकंती
By Admin | Updated: May 19, 2014 23:48 IST2014-05-19T23:48:39+5:302014-05-19T23:48:39+5:30
तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात तीन मुद्रांक विक्रेत्यांची (स्टॅम्प व्हेंडर) नियुक्ती करण्यात आली आहे. या मुद्रांक विके्रत्यांच्या परवान्याचे दरवर्षी नुतनीकरण केले जाते़

मुद्रांकांकरिता ग्राहकांची भटकंती
समुद्रपूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात तीन मुद्रांक विक्रेत्यांची (स्टॅम्प व्हेंडर) नियुक्ती करण्यात आली आहे. या मुद्रांक विके्रत्यांच्या परवान्याचे दरवर्षी नुतनीकरण केले जाते़ यानंतरच स्टॅम्प उचल व विक्री होते; पण येथील तीन व्हेंडरपैकी दोघांचे नुतनीकरण झाले तर एका महिला व्हेंडरच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही़ यामुळे मुंद्रांकांचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ शहरात केवळ तीन मुद्रांक विके्रते असल्याने त्यांच्यावरच संपूर्ण नागरिक अवलंबून असतात़ यातील एक व्हेंडर मुद्रांकांची कमी उचल करतो़ यामुळे ते अल्पावधीतच संपतात तर दुसर्या व्हेंडरला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने ते स्वत:कडे अधिक मुद्रांक ठेवत नाहीत़ आता महिला व्हेंडरच्या परवान्याचे नुतनीकरण न झाल्याने एकच व्हेंडर राहिला़ यामुळे येथे मुद्रांक मिळणे कठीण झाले आहे़ शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांना मुद्रांकाकरिता त्रास सहन करावा लागत आहे़ आजपर्यंत समुद्रपूर तालुक्यात मुद्रांकाकरिता कधीही त्रास जाणवत नव्हता; पण एका व्हेंडरच्या परवान्याच्या नुतनीकरणात अडथळा आल्याने मुद्रांकांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे़ स्टॅम्पकरिता नागरिकांना ४ ते ५ तास रांगेत ताटकळावे लागत असल्याचे दिसून येते़ ग्राहकांनी तक्रार करणे अनिवार्य असले तरी त्यामागील हेतू कुठला, हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. गरजवंतांना नेहमी स्टॅम्पसाठी भटकावे लागणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शासनाने समुद्रपूर या तालुक्याच्या ठिकाणी ठोस निर्णय घेऊन येथील गरजवंत स्टॅम्प ग्राहकांची भटकंती थांबवावी, अशी मागणी होत आहे़ सध्या पीक कर्जाकरिता शेतकर्यांना मुद्रकांची गरज भासत आहे. पूढे दहावी व बारावीचा निकाल लागणार असून विद्यार्थ्यांनाही स्टॅम्पची गरज भासेल़ याकडे लक्ष देत मुद्रांक उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)