गिट्टी खदानीच्या वादातून इसमाला गंभीर मारहाण

By Admin | Updated: September 11, 2016 00:38 IST2016-09-11T00:38:12+5:302016-09-11T00:38:12+5:30

गिट्टी खदान आणि घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून पवन सुभाष गोसेवाडे यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली.

Crushing a lot of greedy food | गिट्टी खदानीच्या वादातून इसमाला गंभीर मारहाण

गिट्टी खदानीच्या वादातून इसमाला गंभीर मारहाण

वर्धा : गिट्टी खदान आणि घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून पवन सुभाष गोसेवाडे यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरातील आरती चौक परिसरात घडली. भर चौकातील या घटनेमुळे दहशत पसरली होती.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सुभाषराव गोसेवाडे हे घराकडे जात होता. दरम्यान, आरती चौक परिसरात शैलेश मानकर याने त्याला अडविले. गिट्टी खदान माझ्या नावावर का करून दिली नाही आणि माझे एक लाख रुपये का दिले नाही, असे म्हणत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केल्याने पवन गंभीर जखमी झाला. शैलेशने त्याच्या गळ्यातील चैनही जबरीने हिसकावून घेत शिवीगाळ व मारहाण केली. याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी मानकर विरूद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६, ३८४, ३९४, १३५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पूढील तपास सुरू आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Crushing a lot of greedy food