नरसाई गडावर उसळली भाविकांची गर्दी

By Admin | Updated: October 14, 2015 02:11 IST2015-10-14T02:11:03+5:302015-10-14T02:11:03+5:30

जिल्ह्यासह विदर्भात सर्वपरिचित असलेल्या आंजी (मोठी) येथील स्वयंभु भगवती नरसामाता मंदिरात मंगळवारपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला.

The crowd of devotees in Narsai fort | नरसाई गडावर उसळली भाविकांची गर्दी

नरसाई गडावर उसळली भाविकांची गर्दी

जागर आदिशक्तीचा : नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
आंजी (मोठी): जिल्ह्यासह विदर्भात सर्वपरिचित असलेल्या आंजी (मोठी) येथील स्वयंभु भगवती नरसामाता मंदिरात मंगळवारपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवसापासून नरसाई गडावर भाविकांची गर्दी ओसंडून वाहात होती.
आंजी गावापासून दीड कि.मी अंतरावर पवनूर जोड रस्त्यावर निसर्गरम्य अश्या गडावर स्वयंभू नरसा मातेचे मंदिर आहे. छोट्याश्या देवी मंदिराचा अलिकडच्या काही वर्षात जिर्णोद्धार करण्यात आला आहे. सदर मंदिर हे गडावर असल्याने हा परिसर निसर्गरम्य आहे. त्यामुळे येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते.
मंगळवारी पहाटे सयाजी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीदरम्यान येथे नवही दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दांडिया व भजन संध्या, रांगोळी स्पर्धा, भवानी मातेचा गोंधळ व लंगर आदींचा समावेश आहे. भाविकांनी आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवा मंडळानी केले आहे.
नरसाई मंदिरासह गावातील बाजार चौकातील अनुसया माता मंदिरात तसेच धाम नदी तिरावरील माता मंदिरातही घटस्थापना झाली असून नवरात्र उत्सवानिमित्त येथेही विविध कार्यक्रम आयोजित असून भाविकाची गर्दी वाढत आहे.(वार्ताहर)

देवीचे मंदिर टेकडीवर असून येथे जाण्याकरिता पायऱ्या बांधण्यात आल्या आहे. उंचावरील हा परिसर निसर्गरम्य आणि आल्हाददायक आहे. त्यामुळे येथे आलेल्या भक्तांना दर्शनाबरोबरच सहलीचाही आनंद मिळतो. देवस्थानमार्फत आलेल्या भक्तांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

Web Title: The crowd of devotees in Narsai fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.