आपट्याची झाडे लावून साजरा होणार दसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:55 IST2017-09-30T00:55:08+5:302017-09-30T00:55:35+5:30
विजयादशमीला साधारणत: आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा सांभाळताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे.

आपट्याची झाडे लावून साजरा होणार दसरा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विजयादशमीला साधारणत: आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा सांभाळताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे. यामुळे आपट्याची पाने तोडून ती एकमेकांना देण्यापेक्षा आपट्याचे झाड लावून दसरा साजरा करण्याचे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने करण्यात आले आहे.
वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने येथील हनुमान टेंकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करून त्याचे संगोपण करण्यात येत आहे. येथे अनेकांनी वाढदिवस, स्मृतीदिन, काही क्षणाच्या आठवणीत वृक्षारोपण केले आहे. त्या वृक्षांचे संवर्धन मंचाच्यावतीने करण्यात येत आहे. याच पद्धतीने येथे येत आपट्याचे झाड लावण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
दसºयाच्या दिवशी अनेकांकडून मोठ्या प्रमाणात आपट्याची झाडे तोडण्यात येत आहेत. या प्रकारातून वेळप्रसंगी वृक्षाची कत्तलही होत आहे. ही थांबविण्याकरिता सजग समाजाने एक पाऊल उचलण्याची गरज आहे. आज सर्वत्र वृक्ष लावा आणि त्याचे संगोपण करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. यामुळे आपण आपली जबाबदारी म्हणून यंदाच्या दसºयाला आपट्याची पाने वाटण्यापेक्षा आपट्याचे एक रोपटे लावून नवा पायंडा पाडू, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचीन पावडे यांच्यासह मंचच्या सदस्यांच्यावतीने करण्यात आले आहे.
दसºयानंतर लगेचच ज्येष्ठ नागरिक दिन
दसºयाच्या दुसºया दिवशी म्हणजेच रविवारी ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिवशीही टेकडीवर येत आपल्या आजी आणि आजोबांच्या स्मृतीत आपट्याचे रोपटे लावावे असे आवाहन मंचच्यावतीने करण्यात आले आहे.