‘त्या’ चोरीच्या छडा लावण्यासाठी गुन्हेगारांची झाडाझडती
By Admin | Updated: November 7, 2016 00:47 IST2016-11-07T00:47:59+5:302016-11-07T00:47:59+5:30
आष्टी येथील गुरूदेव कॉलनीतील कवडकर यांच्या घरातून तोंडाला बांधून व काळे कपडे घालून असलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी दोन वृद्ध महिलांना

‘त्या’ चोरीच्या छडा लावण्यासाठी गुन्हेगारांची झाडाझडती
तिघांच्या घरांची घेतली झडती
वर्धा : आष्टी येथील गुरूदेव कॉलनीतील कवडकर यांच्या घरातून तोंडाला बांधून व काळे कपडे घालून असलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी दोन वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून घरातील रोख, सोन्या-चांदीचे दागिने असा २२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरीने पळविला होता. या प्रकरणात तीनही आरोपींना जेरबंद करण्यासाठी आष्टी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी रेकॉर्डवर असलेल्या तीन अट्टल चोरट्यांच्या घराची झडती घेतल्याचे सांगण्यात आले.
मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास तीन चोरट्यांनी आष्टी येथील गुरूदेव कॉलनीतील कवडकर यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी ७० व ९० वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवित सोन्या-चांदीचे दागिणे, ८ हजार ५०० रुपये असा २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यावरून तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवित त्यांना जेरबंद करण्यासाठी आष्टी पोलिसांनी तपासाला वेग दिला. गुन्हा नोंदविण्यात आल्यापासून २४ तासांत आष्टी पोलिसांनी नोंद असलेल्या तीन अट्टल चोरट्यांच्या घराची झडती घेतली; पण सदर घटनेतील खऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात अद्यापही यश आले नसल्याचे सांगण्यात आले. लवकरच या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्यात यश येईल, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे राजू दहिलेकर करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)