शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सेवाहक्क कायद्याबाबत जागृकता निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 23:44 IST

नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या सेवांचा त्या- त्या विभागाने आढावा घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध आॅनलाईन सेवांची माहिती पोहचवावी. सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सामान्य जनतेला आॅनलाईन व्यवस्थेकडे वळवितांना या कायद्याचे फायदे, प्रशासनानातील पारदर्शकता आणि ठराविक कालावधीत मिळणारी सेवा या बाबीची माहिती जनतेला देऊन नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करावी, ,......

ठळक मुद्देस्वाधीन क्षत्रिय : ५९ सेवांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या सेवांचा त्या- त्या विभागाने आढावा घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध आॅनलाईन सेवांची माहिती पोहचवावी. सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सामान्य जनतेला आॅनलाईन व्यवस्थेकडे वळवितांना या कायद्याचे फायदे, प्रशासनानातील पारदर्शकता आणि ठराविक कालावधीत मिळणारी सेवा या बाबीची माहिती जनतेला देऊन नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करावी, , असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क कायदयाच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, सहायक जिल्हाधिकारी जिंदाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, भूमि अभिलेख अधिक्षक नितीन पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे, यासह सर्व विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांंना मार्गदर्शन करतांना स्वाधीन क्षत्रिय यांनी शासकीय कामकाजात गती, पारदर्शकता आणि ठराविक कालावधीमध्ये नागरिकांना हमखास सेवा मिळावी यासाठी सदर कायदयाची निर्मिती झाल्याचे सांगितले. या कादयाची अंमलबजावणी करतांना अधिकाºयांंनी प्रथम आपल्या विभागाच्या कोणकोणत्या सेवा आॅनलाईन देण्यासाठी अधिसुचित केल्या आहेत याची माहिती करुन घेऊन त्याची माहिती नागरिकांना द्यावी. सर्व सेवा एका छताखाली देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे वेगळी संगणकीय प्रणाली वापरुन आॅनलाईन सेवा देणाºया विभागांनी त्यांच्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत कशा पध्दतीने देता येईल यासाठी पुढाकार घ्यावा. यामुळे नागरिकांना वेगवेगळे संकेतस्थळ आणि पोर्टलवर जाण्याची गरज पडणार नाही. ग्रामपंचायत आणि नगर पालिकांमध्ये असणाºया सेवा केंद्र्रामध्ये सुध्दा शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना आॅनलाईन उपलब्ध करुन दिल्या गेल्या पाहिजेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्यात. या कायदयाची अंमलबजावणी करतांना विविध सेवा केंद्र्राची मदत नागरिक घेत असले तरी उपलब्ध आॅनलाईन सेवा, आपले सरकार पोर्टल व मोबाईल अँप याबाबच्या माहितीचा प्रचार व प्रसार करण्यात यावा, असे आवाहन क्षत्रिय यांनी केले.याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी बाबत सुरूवातीला सादरीकरण केले. यामध्ये जिल्हयात ९१५ केंद्रामार्फत सुरु असलेल्या आॅनलाईन सेवांची माहिती दिली. आतापर्यंत १६ हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच ५९ सेवांसाठी सर्वात जास्त आॅनलाईन प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. या कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांना आॅनलाईन सुविधा देतांना येत असलेल्या अडचणीबाबतही त्यांनी माहिती दिली. महाआॅनलाईनच्या प्रतिक उमाटे यांनी आॅनलाईन सेवासांठी ठरवून दिलेले सेवा शुल्क हे सन २००८ चे आहे, त्यामध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे निर्दशनास आणून दिले. यावेळी बेरोजगारांची नोंदणी आॅनलाईन झाल्यामुळे आणि जिल्हा उद्योग केंद्रात सर्व सेवा आॅनलाईन देत असल्यामुळे कार्यालयात नागरिकांची गर्दी कमी झाली असल्याचे या विभाग प्रमुखांनी सांगितले. जिल्ह्यातील राबविलेले विविध उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी सूचविण्यात येणार असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाचे केले कौतुकजिल्हा सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मायक्रो ए.टी.एम., बचतगटामार्फत सेतू केंद्र चालविणे, संवाद कक्ष टोल फ्री क्रमांक आणि आपले सरकार सेवा केंद्र आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न या नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद