शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

गांधी विचार जनमानसात पोहचविणारा बिहारमधील अवलिया सेवाग्राममध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:35 AM

सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला.

ठळक मुद्देआयुष्यभर गांधीविचारांसाठी केली पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला. भागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजय कुमार सिंग धावक हा अविलया पारंपरिक वेषात आणि भारताचा राष्ट्रध्वज घेऊन सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी आश्रमात आला आहे.हा अवलिया गेल्या ३५ वर्षापासून गांधीजीचे विचार, कार्य आणि भारत मातेचा जयघोष करीत राष्ट्रध्वजाचा सन्मान करा, देशाला राष्ट्रभक्तांच्या त्यागातून स्वराज्य मिळाले त्याचे स्मरण करून देशाच्या एकता, अखंडता, विकास आणि स्वच्छतेसाठी झटा असे देशात फिरून प्रबोधनाचे कार्य करीत आहे. ते स्वत:ला सर्वोदयी आणि गांधी भक्त मानतात. म्हणून त्यांनी स्वत:चे नाव गांधी विजय कुमार यादव धावक असे ठेवले. धावक हे नाव पण त्यांनी जोडले. त्या मागील कारण सांगितले ते असे की, ते शाळा, महाविद्यालयात धाव स्पर्धेत सहभागी होत असत. त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत पण भाग घेतला होता. १९९० मध्ये राजीव गांधी भागलपूरला सदभावना यात्रेसाठी आले होते. त्यात मी ही सहभागी होऊन धावलो. राजीव गांधीनी मला पाहिले व गाडीवर बोलावून गळयात हार टाकून सन्मानित केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.ते म्हणाले मी नॅशनल युथ प्रोजेक्टचे प्रमुख डॉ. सुब्बारावजी यांना खूप मानतो. त्यांच्या आणि सर्वोदयाच्या प्रत्येक शिबिरे आणि संमेलनात सहभागी होतो.अरूणाचल प्रदेशातील दुर्गम भागात त्यांनी प्रवास केला. चंपारण्यमध्ये फिरलो आहे. भीती हा शब्द त्यांना माहित नाही.ते म्हणाले गांधीवाद्यांनी युवकांना संधी दिली पाहिजे. गांधीवाद गावागावात पोहचला पाहिजे. तेव्हाच हा देश खऱ्या अर्थाने विकास पावेल. मी जगतो देश व तिरंग्यासाठी. म्हणूनच तिरंगा फडकवत सन्मानाने देशभर फिरत आहे.संमेलन संपल्यानंतर ते हरियाणासाठी रवाना होणार आहे. ते अविवाहित असून जनता त्यांना आर्थिक मदत करत असते. ते एल.एल.बी झाले असून पैसा व नोकरीसाठी कधीच धडपड केली नाही.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम