कुरझडी पुलावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:10+5:30

कुरझडी-जामठा या मार्गाने दररोज अनेक नागरिक आवागमन करतात. रस्त्यावर असलेल्या पुलावर भलामोठा खड्डा पडला असून काही दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात ट्रकचे चाफ फसले होते. तसेच या मार्गाने ये-जा करणाºया अनेकांचे अपघात होवून त्यांना गंभीर मार लागला आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागाला तक्रारी करून खड्डा बुजविण्याची मागणी करण्यात आली.

The crater on the bridges is becoming fatal | कुरझडी पुलावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

कुरझडी पुलावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघातमालिका सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव(नि.) : नजिकच्या कुरझडी ते जामठा या प्रमुख मार्ग असून रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा सध्या आवागमन करणाऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. याकडे मात्र, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून रस्त्यावरील खड्डा तत्काळ न बुजविल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंच किरण चौधरीसह ग्रामस्थांनी दिला आहे.
कुरझडी-जामठा या मार्गाने दररोज अनेक नागरिक आवागमन करतात. रस्त्यावर असलेल्या पुलावर भलामोठा खड्डा पडला असून काही दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात ट्रकचे चाफ फसले होते. तसेच या मार्गाने ये-जा करणाºया अनेकांचे अपघात होवून त्यांना गंभीर मार लागला आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागाला तक्रारी करून खड्डा बुजविण्याची मागणी करण्यात आली. पण, संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेऊन संबंधित विभागाला ठरावाची प्रत दिली. पण, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही.
याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कुरझडीचे सरपंच किरण चौधरी, बालू धनविज, मनोज चौधरी, सुभाष तळवेकर, बंडू धनविज, अतुल भोस्कर, सूरज गरड आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.

लोखंडी सळाखी उघड्या पडल्याने अनेकांचे अपघात
कुरझडी ते जामठा रस्त्यावर असलेल्या पुलाच्या मधात मोठाला खड्डा पडला आहे. रात्रीच्या सुमारास आवागमन करणाºया नागरिकांना खड्डा दिसत नसल्याने दररोज अपघात होत आहे. इतकेच नव्हेतर रस्त्यावरिल लोखंडी सळाखा उघड्या पडल्या असून वाहनांचे चाक त्या सळाखीवरून जात अपघात घडत आहेत. अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले असून एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्य रस्त्यावरील पुलावर अनेक दिवसांपासून मोठाला खड्डा पडलेला आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीतर्फे ठराव घेऊन बांधकाम विभागाला त्याबाबतचे पत्रही दिले आहे. पण, याची दखल घेतल्या गेली नाही.
-किरण चौधरी, सरपंच कुरझडी(जा.)

Web Title: The crater on the bridges is becoming fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.