लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सीपीआर म्हणजेच हृदय व श्वसन रक्षण कौशल्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. कोणत्याही साधनांशिवाय आपातकालीन परिस्थितीत तुम्ही मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीचे प्राण वाचवू शकता. या कौशल्यामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनदान देता आले तर ती आपल्यासाठी आयुष्यभर समाधान देणारी बाब असते, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील निकोसे यांनी पत्रकारांकरिता आयोजित हृदय व श्वसन रक्ष कौशल्य विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत केले.सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी केले. व्यासपीठावर अभिमत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, डॉ. वीरेंद्र बेलेकर, डॉ. श्रद्धा पटेल, डॉ. वृंदा सोरते, विशाल जग्यासी आदींची उपस्थिती होती.वृत्तपत्र व वृत्तवाहिनी माध्यमांतील प्रतिनिधी हा समाजातील सजग घटक असून त्यांच्या प्रशिक्षित असण्याने अनेकांना जीवनदान प्राप्त होईल, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले. डॉ. निकोसे व डॉ. श्रद्धा पटेल यांनी मार्गदर्शन करताना अपघातात तसेच आकस्मिक प्रसंगी आपादग्रस्त व्यक्तीला सीपीआर देताना कोणती दक्षता घ्यावी, प्रथमोपचार कसा करावा, याबाबत क्रमवार सप्रयोग मांडणी केली. अवघ्या दोन तीन मिनिटांच्या सीपीआर अर्थात कार्डिओपल्मोनरी रिसस्सीटेशन कौशल्यामुळे ह्युमन व्हर्च्युअल टेबलच्या सहाय्याने शरीरातील हृदयाचे स्थान, रक्तप्रवाह यंत्रणा व श्वसनातील अवरोध, तंत्रशुद्ध सीपीआर पद्धती, हाताद्वारे पंपिंग व तोंडावाटे श्वास देणे, आदी उपयुक्त ठरणारी माहिती अत्यंत सोप्या भाषेत सांगण्यात आली. यावेळी सर्व सहभागी पत्रकारांकडून प्रात्यक्षिकेही करून घेण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता संध्या डफ, हेमंत पुंडकर, नीलेश ठाकरे आदींनी सहकार्य केले.
सीपीआर प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांसाठी गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:36 IST
सीपीआर म्हणजेच हृदय व श्वसन रक्षण कौशल्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. कोणत्याही साधनांशिवाय आपातकालीन परिस्थितीत तुम्ही मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीचे प्राण वाचवू शकता.
सीपीआर प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांसाठी गरजेचे
ठळक मुद्देनिकोसे : हृदय व श्वसन रक्ष कौशल्य प्रशिक्षण