एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST2021-08-01T05:00:00+5:302021-08-01T05:00:12+5:30
विशेष म्हणजे शुक्रवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती दिली असता, नागरिकांचा त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १९ हजार ६१५ व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या १२ हजार २४ व्यक्ती तर लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या ७ हजार ५९२ लाभार्थींचा समावेश आहे.

एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाकडून अल्प लससाठा देऊन वर्धा जिल्ह्याची लसकोंडी केली जात असली तरी तोकड्या लससाठ्याच्या जोरावर जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कोविड लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार १८६ व्यक्तींना लसीचा पहिला तर १ लाख १९ हजार ३६६ लाभार्थींना कोविड व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे शुक्रवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती दिली असता, नागरिकांचा त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १९ हजार ६१५ व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या १२ हजार २४ व्यक्ती तर लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या ७ हजार ५९२ लाभार्थींचा समावेश आहे. सोमवारी पुन्हा नव्या जोमाने लसीकरण मोहिमेला गती देण्याचे आरोग्य विभागाच्या विचाराधीन असून केवळ लससाठ्याची प्रतीक्षा आहे.
तरुणांमध्ये उत्साह
- शुक्रवारी एकाच दिवशी १९ हजार ६१५ व्यक्तींनी नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली. यात १५९ हेल्थ केअर वर्कर्स, ७४ फ्रन्टलाईन वर्कर्स, १८ ते ५५ वयोगटातील १० हजार १३ व्यक्ती, ४५ ते ६० वयोगटातील ५ हजार ६६५ व्यक्ती तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील ३ हजार ७०४ लाभार्थींचा समावेश आहे. एकूणच शुक्रवारी लसीकरणाबाबत तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
जिल्ह्याला कोविडची लस टप्प्याटप्प्याने मिळत आहे. लससाठा मिळताच जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती दिली जात आहे. आतापर्यंत ३ लाख ८१ हजार १८६ लाभार्थींना लसीचा पहिला तर १ लाख १९ हजार ३६६ लाभार्थींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.