शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण-तरुणीला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:01 IST

बाल वयापासूनच मुलामुलींना प्रशिक्षण दिले पाहिजे. आतंकवाद, दहशतवाद, हिंसात्मक वृत्ती हद्दपार करण्यासाठी तरुण-तरुणींना साहसी बनविले पाहिजे. जेणे करुन देशासमोर येणारे कोणतेही संकट सहजपणे टाळता येवू शकते. यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण तरुणींना आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : एक दिवसीय बाल महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाल वयापासूनच मुलामुलींना प्रशिक्षण दिले पाहिजे. आतंकवाद, दहशतवाद, हिंसात्मक वृत्ती हद्दपार करण्यासाठी तरुण-तरुणींना साहसी बनविले पाहिजे. जेणे करुन देशासमोर येणारे कोणतेही संकट सहजपणे टाळता येवू शकते. यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण तरुणींना आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.अ‍ॅडव्हेंचर हिलर्स, कब बुलबुल बाल महोत्सव व आपत्ती व्यवस्थापन दलाच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आय. टी. आय. टेकडीवर उभारलेल्या एडव्हेंचर हिल्स येथे स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था व वर्धा भारत स्काऊट आणि गाईड यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार रामदास तडस उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी पुरुषोत्तम दारवणकर, चैताली राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के, महेश मोकळकर, शकुंतला चौधरी, सहा. राज्य आयुक्त आर.आर. जयस्वाल, हरीश इथापे, डॉ. राजेंद्र बोरकर, मुरलीधर बेलखोडे,प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, पोलीस निरीक्षक अशोक चौधरी, प्राचार्य मदन मोहता, प्राचार्य खुशाल मून, राम बाचले, रेणुका भोयर, क्रीडा संकुलचे व्यवस्थापक रवि काकडे, आर्किटेक्ट नयन निस्ताने, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले, निर्मला नादुरकर, राज्य मंडळ प्रतिनिधी भरतकुमार सोनटक्के, दत्तराज भिष्णूरकर, वडाळकर, मुख्याध्यापक व एडव्हेंचर हिल्स प्रकल्पाचे प्रमुख तथा स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. मुलांना बालपणापासून साहसी उपक्रमांत सहभागी करणे गरजेचे आहे. हा हेतु समोर ठेवून प्रगत राष्ट्रात २ वर्ष सैनिकी प्रशिक्षण आवश्यक केलेले आहे. अशाच प्रकारच्या प्रशिक्षणाची आपल्याही देशात गरज आहे. असे प्रतिपादन अतुल तराळे यांनी केले. तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले युवा पिढीसाठी अडथळा पार प्रशिक्षण आवश्यक केल्यास उंच मनोबल असलेले व सैनिकी मानसिकता असलेले भावी नागरिक देशाला मिळतील असे सांगितले.प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी तर संचालन सतीश इंगोले व विजया व्यवहारे यांनी केले तर आभार वैशाली अवथळे यांनी मानले.वर्धा भारत स्काऊट गाईडच्यावतीने बाल महोत्सवात शहरातील १५ शाळेतील ३५० मुले मुली सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६ नोव्हेंबरच्या शहीदांना देवळीच्या एस.एस. एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्र सैनिकांनी सलामी दिली. यावेळी प्रमुख अतिथींनी शहीद स्मृतिंवर पुष्पचक्र अर्पण केले. स्काऊटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल व प्रहारचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण घेत असणाऱ्या तरुणांनी २१ प्रकारच्या अडथळा पार साहसी प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक अतिथींसमोर सादर केले.