८१ हजार ६०० रुपयांचा देशी दारूसाठा जप्त

By Admin | Updated: May 29, 2017 01:11 IST2017-05-29T01:11:36+5:302017-05-29T01:11:36+5:30

घरात देशी दारूचा साठा केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. यात ८१ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

The country's groceries worth Rs. 81 thousand 600 were seized | ८१ हजार ६०० रुपयांचा देशी दारूसाठा जप्त

८१ हजार ६०० रुपयांचा देशी दारूसाठा जप्त

तेलंगखडी वॉर्डात धाड : १७ देशी दारूचे खोके केले हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : घरात देशी दारूचा साठा केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. यात ८१ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई हिंगणघाट पोलिसांनी शनिवारी रात्री केली.
रात्री गस्त सुरू असताना तेलगखंडी वॉर्ड येथील रिंकू भालेराव याने घरी देशी दारूचा साठा केयाची माहिती मिळाली. यावरून पंच व पोलीस कर्मचाऱ्यांनी भालेराव याच्या तेलगखंडी येथील घरावर धाड टाकली. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पसार झाला. त्याच्या राहत्या घराची पोलिसांनी दोन पंचांना बोलवून झडती घेतली. यात ८१ हजार ६०० रुपयांची दारू जप्त करीत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार राजेंद्र शिरतोडे आणि पीएसआय प्रवीण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिशन ईप्पर, निलेश तेलरांधे, संतोष वनस्कर आदींनी केली.

Web Title: The country's groceries worth Rs. 81 thousand 600 were seized