शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

देश अघोषित आणीबाणीच्या सावटाखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:57 PM

या देशात दीर्घकाळ टिकून रहायचे असेल तर देशातील लोकशाहीच संपुष्टात आणली पाहिजे. या दिशेने सध्या मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारच्या बाजूने रहाल तर लाभ मिळेल आणि विरोधात जाल तर घरादारावर छापे पडतील, याची जाणीव सरकार वारंवार करून देत आहे.

ठळक मुद्देपुण्यप्रसून वाजपेयी : दिनकरराव मेघे स्मृति व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : या देशात दीर्घकाळ टिकून रहायचे असेल तर देशातील लोकशाहीच संपुष्टात आणली पाहिजे. या दिशेने सध्या मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारच्या बाजूने रहाल तर लाभ मिळेल आणि विरोधात जाल तर घरादारावर छापे पडतील, याची जाणीव सरकार वारंवार करून देत आहे. देशावर अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे, मात्र त्याविरूद्ध कुणीच बोलत नाही, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार व वृत्तविश्लेषक पुण्यप्रसून वाजपेयी यांनी व्यक्त केली. प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित बाराव्या व्याख्यानमालेत पुण्यप्रसून वाजपेयी यांनी ‘प्रसार माध्यमांची भूमिका आणि लोकतंत्र’ या विषयाची मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रकाश दुबे होते. मंचावर ज्येष्ठ विधीज्ञ एन.एन. ठेंगरे, सविता मेघे, श्रीकांत बारहाते, निलीमा भट्टाचार्य यांची उपस्थिती होती.नवे सरकार सत्तेत आले की त्याला काम करण्यासाठी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याचा समंजसपणा निश्चितच प्रसार माध्यमांमध्ये असतो. मात्र, हा कालावधी तरी किती असावा? सरकार पोकळ बाता करणार असेल तर माध्यमांना आपली भूमिका बजावणे क्रमप्राप्त आहे. मात्र, आता सरकारविरूद्ध बोलणाऱ्या माध्यमांचीच मुस्कटदाबी सुरू झाली आहे, असे वाजपेयी म्हणाले. सरकारच्या राजकीय भूमिकांची तटस्थ चिकित्सा करण्याचे सामर्थ्य प्रसार माध्यमांमध्ये आहे. मात्र, आम्ही तुम्हाला नफा मिळवून देतो, पण तुम्ही आमचेच गुणगान करायचे, अशी थेट अंमलबजावणी या सरकारने सुरू केली. असे ही वाजपेयी याप्रसंगी म्हणाले.या कार्यक्रमात माज खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते पुण्यप्रसून वाजपेयी व प्रकाश दुबे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत बारहाते यांनी केले. संचालन नीलिमा भट्टाचार्य मेघे यानी केले. प्रारंभी प्राचार्य मेघे यांचे जीवनकार्य चित्रफितीतून मांडण्यात आले. अतिथींचे स्वागत अ‍ॅड. प्रकाश मेघे, प्रा. किरण मेघे, शुभदा रूद्रकार व प्रा. राजेश बाळसराफ यांनी केले. आभार डॉ. अभ्युदय मेघे यांनी मानले.