शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची तूर सोडून व्यापाऱ्यांच्या तुरीची मोजणी

By admin | Updated: February 27, 2017 00:29 IST

गेटपास घेवून क्रमवारीनुसार पहिले तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुरीची मोजमाप करण्याऐवजी नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी

पुलगाव बाजारात नाफेडच्या तूर खरेदीवरून वादंग पुलगाव : गेटपास घेवून क्रमवारीनुसार पहिले तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुरीची मोजमाप करण्याऐवजी नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी तूर घेवून आलेल्या एका व्यापाऱ्याच्या तुरीची मोजणी रविवारी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावरून पुलगाव बाजार समितीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. झालेल्या या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे तक्रार केली. यावरून समितीचे सचीव आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांसमक्ष या प्रकाराचा पंचनामा केला असून झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले. परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर नाफेडला विकण्याकरिता बाजारात आणली. मात्र नियमांची बतावणी करून नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप न करता त्याचे ढिग समितीच्या आवारात लावून ठेवले. शेतकऱ्यांना तुरीला चाळणी मारण्याकरिता वेळ नसल्याचे सांगण्यात आले. अशातच शनिवारी एका व्यापाऱ्याची तूर बाजार समितीत आली. यात नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी क्रमवारीनुसार पूर्वी आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करण्याऐवजी शनिवारी आलेल्या व्यापाऱ्याच्या तुरीचे मोजमाप केले. याची माहिती येथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी आक्षेप घेतला. या प्रकाराची माहिती देण्याकरिता त्यांनी थेट बाजार समितीच्या सभापतींचे कार्यालय गाठले. यावरून सभापतींनी झालेल्या प्रकाराचा पंचनामा करण्याच्या सूचना सचिव आणि संचालक मंडळाला दिल्या. पंचनामा करण्याकरिता मंडळ येथे पोहोचले असता तब्बल १३३ पोते तुरीची मोजणी होत असल्याचे दिसून आले. या तुरीच्या पोत्याचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती सचिवांनी दिली.(तालुका प्रतिनिधी) सुटीच्या दिवशी खरेदीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयत नुकतीच सभा पार पडली. या सभेला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची उपस्थिती होती. त्यांना शेतकऱ्यांचा शेतमाल सुटीच्या दिवशी बाजारात आला तरी त्याची खरेदी करा अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे रविवारी बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ असल्याचे चित्र होते.