लाचखोर सीओला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:14+5:30

वर्ध्यातील कंत्राटदाराने सिंदी (रेल्वे) नगरपालिकेअंतर्गत विविध कामे केली आहे. कामे पूर्ण झाली असल्याने देयक मागितले असता मुख्याधिकारी कैलास झंवर यांच्याकडून ६० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तक्रारीवरून वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ध्यातील धुनिवाले मठ चौकात सापळा रचून मुख्याधिकारी झंवर यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

Corrupt CO to police cell | लाचखोर सीओला पोलीस कोठडी

लाचखोर सीओला पोलीस कोठडी

ठळक मुद्दे६० हजारांची लाच स्वीकारण्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कंत्राटदाराकडून ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदी (रेल्वे) येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास झंवर यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आणखी काही माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वर्ध्यातील कंत्राटदाराने सिंदी (रेल्वे) नगरपालिकेअंतर्गत विविध कामे केली आहे. कामे पूर्ण झाली असल्याने देयक मागितले असता मुख्याधिकारी कैलास झंवर यांच्याकडून ६० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तक्रारीवरून वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ध्यातील धुनिवाले मठ चौकात सापळा रचून मुख्याधिकारी झंवर यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शुक्रवारी न्यायमूर्ती एन. जी. सातपुते यांच्या न्यायालयात हजर केले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मागणीनुसार एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्याधिकारी झंवर यांनी यापूर्वीचेही देयक काढण्यासाठी मोठी लाच घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाचखोरीचे हे प्रकरण पुढे नवीन कुठले वळण घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 

Web Title: Corrupt CO to police cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.