शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: खाकी वर्दीवाल्यांचं ‘ऑपरेशन कोरोना’; धार्मिक स्थळांमध्ये दडून बसलेल्यांची घेतली जातेय माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 16:52 IST

या घोषणेनंतर दिल्ली निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी ए-जमातच्या कार्यक्रमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचे पुढे आले आहे.

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबतचा संभाव्य धोका लक्षात घेऊन २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दिल्ली निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी ए-जमातच्या कार्यक्रमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पोलिसांनीही दक्षता म्हणून वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक धार्मिक स्थळांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन कोरोना’ असे नाव दिले असून धार्मिक स्थळांमध्ये कुणी दडून तर बसलेले नाही ना याची शहानिशा केली जात आहे.राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉक डाऊनची घोषणा केली. लॉक डाऊनच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी कुठलेही धार्मिक, सांस्कृतिक व सामूहिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, नियमांना बगल देत दिल्लीत एक धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले व्यक्ती देशातील विविध भागात नियोजित ठिकाणी पोहोचले. सध्या संपूर्ण शासन व प्रशासनाची झोप उडाली आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसला तरी दक्षता म्हणून पोलिसांकडून जिल्ह्यातील प्रत्येक धार्मिक स्थळांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १२ धार्मिक स्थळांची पाहणी केली आहे. परंतु, कुणी तेथे चोरपावलांने आश्रय घेतल्याचे निदर्शनास आलेले नाही. कुठल्याही धार्मिक स्थळात कुणी चोरपावलांनी राहत असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.-----------मंदिर, मशीद, गुरूद्वारा, चर्च आदी धार्मिक स्थळांमध्ये चोरपावलांनी कुणी आश्रय घेतला आहे काय याची शहानिशा करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ऑपरेशन कोरोना’ राबविल्या जात आहे. आतापर्यंत सुमारे १२ धार्मिक स्थळ तपासण्यात आली आहेत. कुठल्याही धार्मिक स्थळांमध्ये चोरीलनीने कुणी राहत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य गरजेचे आहे.- निलेश मोरे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस