मोहरमच्या उत्साहावर कोरोनाचे विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:38+5:30

मोहरमला सुरुवात होताच विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील भाविक फरीद बाबा टेकडीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या काळात हा दर्गाह भाविकांसाठी दिवसरात्र सुरू असतो. मोहरमच्या वेळेस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मोहरमनिमित्त गिरड शहर आणि परिसरात दोनशे छड्या (सवाºया) बसविण्यात येतात. या सर्व सवाऱ्या वाजतगाजत दर्शनासाठी दर्गाहवर दाखल होत असतात.

The coronation on the eve of Moharram | मोहरमच्या उत्साहावर कोरोनाचे विरजण

मोहरमच्या उत्साहावर कोरोनाचे विरजण

ठळक मुद्देगिरड येथील फरीदबाबा दर्गाह : शेकडो वर्षांची परंपरा खंडित

लालसिंग ठाकूर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : विदर्भातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शेख फरीद बाबा दर्गाहवर वर्षभर भाविकांची वर्दळ असते. या दर्गाहवरील मुख्य उत्सव मोहरम सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा मोहरम तसेच गणेशोत्सव एकत्र आल्याने भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. मात्र, कारोनाने सण-उत्सवांच्या उत्साहावर यंदा विरजण घातले आहे.
मोहरमला सुरुवात होताच विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील भाविक फरीद बाबा टेकडीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या काळात हा दर्गाह भाविकांसाठी दिवसरात्र सुरू असतो. मोहरमच्या वेळेस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मोहरमनिमित्त गिरड शहर आणि परिसरात दोनशे छड्या (सवाºया) बसविण्यात येतात. या सर्व सवाऱ्या वाजतगाजत दर्शनासाठी दर्गाहवर दाखल होत असतात.
मोहरममधील पंचमीचा दिवस हा येथील मुख्य दिवस. यादिवशी गिरडच्या पायथ्याशी असलेल्या साखरबाहुली येथून दर्गाह कमिटीतर्फे शाही संदल काढला जातो. यामध्ये विदर्भातील सुप्रसिद्ध बॅण्डपथक, देखावे, उंट, घोडे आणि मनमोहक रोषणाई केलेली असते. उत्सवानिमित्त दर्गाहाची विशेष दजावट केली जाते. गिरड गावातून मिरवणूक काढून दर्गाहवर समारोप होतो. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या हजारावर भाविकांसाठी कमिटीतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. रात्रभर कव्वालीचा कार्यक्रम सुरू असतो. त्यानंतर शेख फरीद बाबांच्या मजारीची पूजा केली जाते.
यावेळी कोरोना विषाणू संसर्गामुळे या सर्वच कार्यक्रमांवर शासन-प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आल्याने शेकडो वर्षांची परंपरा खंडित होणार असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

उलाढाल थांबली, रोजगारावरही परिणाम
मोहरमच्या काळात लाखो रुपयांची उलाढाल होत असुन स्थानिकांना येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. यंदा गणेशोत्सव व मोहरम सणावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे गर्दीवर प्रतिबंध लावून कार्यक्रमासाठी नियमावली तयार करून देण्यात आली आहे. या उत्सवाप्रसंगी सुरक्षित अंतर ठेवून पूजेला २ ते ३ लोक उपस्थित असावे. या नियमावलीच गणेशोत्सव व मोहरम साजरा करावा लागणार असल्याने भाविकांच्या उत्सवावर कोरोनारुपी विरजण पडले आहे.

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या शेख फरीद बाबाच्या टेकडीवर मोहरम सणाकरिता हजारो भाविक दाखल होतात. वर्षभरातील या दर्गाहवरचा हा प्रमुख उत्सव. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार हा कार्यक्रम करण्यात येईल. या ठिकाणी कमिटीतर्फे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. खालचे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून भाविकांनी कमिटीला सहकार्य करावे.
- करीमोद्दीन काजी, अध्यक्ष, बाबा फरीद दर्गाह, गिरड.

Web Title: The coronation on the eve of Moharram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.