‘एचक्यू’वरच राहणार जिल्ह्यात कोरोनाची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:25+5:30

गृहविलगीकरणात असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आल्यास आणि ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यास वर्धा जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकारने ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांसाठी काही सवलती लागू केल्या आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू आहेत.

Corona's presence in the district will be based on HQ | ‘एचक्यू’वरच राहणार जिल्ह्यात कोरोनाची भिस्त

‘एचक्यू’वरच राहणार जिल्ह्यात कोरोनाची भिस्त

ठळक मुद्देआठ हजारांवर पोहोचली होम क्वारंटाईन व्यक्तींची संख्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात गेल्या अठरा दिवसात सात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. यातील चार रुग्ण जिल्ह्यातील असून तिघे जिल्ह्याबाहेरील आहेत. आता जिल्ह्यात परप्रांत व बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा मोठा लोंढा दररोज वाढत आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या ८ हजार १२४ झाली आहे. यात अनेक व्यक्ती परवानगी घेऊन व काही चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दाखल झालेले आहे. रेड झोनमध्ये असलेल्या देशभरातील विविध ठिकाणावरून ही मंडळी आलेली असल्याने यांच्या १४ दिवसाच्या वास्तव्यावरच आता वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अवलंबुन राहणार आहे.
गृहविलगीकरणात असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आल्यास आणि ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यास वर्धा जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकारने ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांसाठी काही सवलती लागू केल्या आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू आहेत. त्याच बरोबर मे महिन्यापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या वर्धा जिल्ह्यात १८ दिवसांत सात रुग्ण आढळून आले आहेत. सुरूवातील बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. मात्र, मे महिन्यानंतर अनेकांनी स्वगावाची वाट धरल्याने आता प्रत्येक गावात बाहेर जिल्ह्यातून दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १९ मे पर्यंत वर्धा जिल्ह्यात ८ हजार १२४ नागरिक आले असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये वर्धा तालुक्यात २ हजार १८६, सेलू तालुक्यात ८७१, देवळी तालुक्यात ७२६, आर्वी तालुक्यात १०२२, आष्टी तालुक्यात ८९५, कारंजा तालुक्यात १२४, समुद्रपूर तालुक्यात ६१० आणि हिंगणघाट तालुक्यात १ हजार ६९० नागरिकांचा समावेश आहे.

गृह विलगीकरणातूनच अहवाल आला ‘पॉझिटीव्ह’
नवी मुंबई येथून आर्वी तालुक्यातील जामखुटा या गावात दाखल झालेल्या चार व्यक्तींना आरोग्य प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी तिघांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ८ हजारांवर नागरिक आपआपल्या घरी विलगीकरणात असले तरी ते रेड झोन मधून आले असल्याने त्यांच्यातील लक्षणे १४ दिवसानंतरच स्पष्ट होतात. त्यामुळे त्यांच्यावरच आता वर्धा जिल्ह्यातील कोरोना अस्तित्व अवलंबुन आहे. आपल्याला भीती नाही असे म्हणून चालणार नाही. वर्धा जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या आणखी ५ ते ७ हजारांनी वाढण्याची शक्यता असून विदेशातूनही दोन नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वर्धा जिल्ह्यात कायमही राहू शकतो.

म्हणूनच १० हजाराच्या दंडाची तरतूद
वर्धा जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, येथे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गृह विलगीकरणावर भर देत त्यासाठीची विशेष रणनीती आखून त्यावर अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. कुटुंब क्वारंटाईन सध्या केले जात आहे. शिवाय गृहविलगीकरणाचा नियम तोडणाऱ्या व्यक्ती व त्याच्या कुटुंबींयांना १० हजार रुपयांचा दंड व फौजदारी कारवाई करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. अशी तरतूद करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरू पाहत आहे.

Web Title: Corona's presence in the district will be based on HQ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.